स्थलांतरित कामगारांना शमीने दिला मदतीचा हात

टीम ई-सकाळ
Tuesday, 2 June 2020

राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या घरी परतत असणाऱ्या कामगारांना मदतीचा हात देत मोहम्मद शमीने माणूसकी  जपण्याचा संदेश दिल्याचे पाहायला मिळाले.

साहसपूर : जगभरात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे खेळाची मैदाने ओस पडली आहेत. कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाउन लागू करुन सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून लढा देण्यात येत आहे. सरकार आणि प्रशासनाच्या नियमावलींचे पालन करुन आपल्याला संकटातून बाहेर पडायचे आहे, असा संदेश खेळाडूंनीही आपल्या चाहत्यांना दिला आहे. संकटजन्य परिस्थितीतून सावरत पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील भरवशाचा गोलंदाज मोहम्मद शमीही कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मैदानात उतरला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या घरी परतत असणाऱ्या कामगारांना मदतीचा हात देत मोहम्मद शमीने माणूसकी  जपण्याचा संदेश दिल्याचे पाहायला मिळाले.

खेलरत्न पुरस्कार नामांकन मिळाल्यावर हिटमॅन रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया

शमीने खाद्य पदार्थासह तोंडाला लावण्यासाठी मास्कचे वाटप केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोहम्मद शमीचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये  शमी बस मध्ये बसलेल्या प्रवाशांना मदत करत असल्याचे दिसते. कोरोना महामारीमुळे अनेक स्थलांतरित कामगार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आपल्या घरी पुन्हा परत जात असल्याचे चित्र देशभरात मागील काही दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे या गरीब कामगारांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत.

संगकारा म्हणाला, गोंधळ धोनीमुळे झाला नव्हता तर...

दिल्ली ते लखनऊ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24 वर भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आपल्या  घरी प्रवास करणाऱ्या स्थलांतरित कामगारांना खाण्याचे डब्बे आणि तोंडाला लावण्यासाठी मास्कचे वाटप केले. शमीने साहसपूर येथील आपल्या घराजवळच स्थलांतरित कामगार व अन्य कोरोनाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी फूड डिस्ट्रीब्यूशन सेंटर उभारले आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू वीरेंद्र सेहवागने देखील अशाच प्रकारे स्थलांतरित कामगारांना मदत करत खाण्यासाठीचे डब्बे दिले होते. याशिवाय पठाण बंधूंनीही आणि अन्य काही क्रिकेटर्संनी कोरोनाजन्य परिस्थितीत अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात दिला होता. 


​ ​

संबंधित बातम्या