अपंग क्रिकेटपटूंच्या वर्ल्ड सिरीजमध्ये भारत चॅम्पियन

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

भारताने शारिरीकदृष्ट्या अपंग क्रिकेटपटचूंच्या स्पर्धेत विजेतेपद संपादन केले आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला 36 धावांनी हरविले. त्याआधी उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर मात केली होती. गेल्याच महिन्यात भारताच्या राष्ट्रीय संघाला वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते. अशावेळी अपंग क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या जन्मभुमीत कौतूकास्पद यश मिळविणे अभिमानास्पद ठरले.

इंग्लंड क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेत सहा देशांचा सहभाग होता. अंतिम सामन्यात वुर्स्टरमधील न्यू रोड स्टेडियमवर झाला. कर्णधार विक्रांत केणी याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. रविंद्र संते याने 34 चेंडूंत 53 धावा केल्या. त्याने दोन चौकार व चार षटकार मारले. भारताने 180 धावा केल्या. केणीने 29, तर कुणाल फणसेने 36, तर सुगणेश महेंद्रनने 33 धावांची भर घातली. 

भारताने मग इंग्लंडला 144 धावांत रोखले. फणसे आणि सनी गोयत यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

संबंधित बातम्या