INDvsSA : भारताचा कसोटी संघ जाहीर; केला हा धक्कादायक बदल

वृत्तसंस्था
Thursday, 12 September 2019

दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन दिवसांत भारतात येणार असून 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकायांच्यातील मालिकेला सुरवात होणार आहे. आधी ट्वेंटी20 आणि मग कसोटी मालिका असा आफ्रिकेच्या दौऱ्याचा कार्यक्रम असेल. यासाठी भारतीय संघाने आज आपला संघ जाहीर केला. 

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन दिवसांत भारतात येणार असून 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकायांच्यातील मालिकेला सुरवात होणार आहे. आधी ट्वेंटी20 आणि मग कसोटी मालिका असा आफ्रिकेच्या दौऱ्याचा कार्यक्रम असेल. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने आज आपला संघ जाहीर केला. 

कसोटी संघात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या लोकेश राहुलला अखेर संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्याजागी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे. तसेच शुभमन गिललासुद्धा संधी देण्यात आली आहे.  गोलंदाजीची धुरा जसप्रितबुमरा, ईशांत शर्मा, महंमद शमी, आर अश्विन, कुलदीप यादव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

दौन टप्यांत दौरा
हा दौरा दोन टप्यांत होईल. पहिल्या टप्यांत प्रत्येकी तीन टी20 आणि कसोटी होतील. त्यानंतर पुढील वर्षी मार्च महिन्यात तीन वन-डे होतील.

टी20
पहिला सामना :15 सप्टेंबर - धरमशाला
दुसरा सामना : 18 सप्टेंबर - मोहाली
तिसरा सामना : 22 सप्टेंबर - बेंगळुरू

कसोटी
पहिली लढत : 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम
दुसरी लढत : 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे - 
तिसरी लढत : 19 ते 23 ऑक्टोबर - रांची

वन-डे
पहिला सामना : 12 मार्च 2020 - धरमशाला
15 मार्च 
दुसरा सामना : 15 मार्च 2020 - लखनौ
तिसरा साना : कोलकता  - 18 मार्च


​ ​

संबंधित बातम्या