AUSvsIND : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील अविस्मरणीय विजयाची कहाणी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

स्मिथ-वॉर्नर परतल्यामुळे कांगारुंची ताकद वाढली असून ते भारतीय संघाला सहजा सहजी मालिका जिंकू देणार नाहीत. त्यामुळे ही मालिका निश्चितच रंगतदार होईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर नजर टाकूयात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या अविस्मरणीय यशाबाबत... 

AusvsIND Border Gavaskar Trophy 2020 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी 2018 मध्ये टीम इंडियान ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला होता. विराटच्या नेतृत्वाखाली यापूर्वी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. स्मिथ-वॉर्नर परतल्यामुळे कांगारुंची ताकद वाढली असून ते भारतीय संघाला सहजा सहजी मालिका जिंकू देणार नाहीत. त्यामुळे ही मालिका निश्चितच रंगतदार होईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर नजर टाकूयात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या अविस्मरणीय यशाबाबत... 

30 डिसेंबर 1977 - 4 जानेवारी 1978 (मेलबर्न) 
भारतीय क्रिकेट संघ  1977-78 च्या सत्रात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर  5 सामन्यांची कसोटी मालिका खेळला होता. ऑस्ट्रेलियाने ही मालिका  3-2 अशी जिंकली होती.  वर्ल्ड सीरीज क्रिकेटमधील ही पहिली मालिका होती. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या बॉब सिम्पसन यांना संघात पुन्हा बोलावले होते. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने गमावलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करुन क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. हा सामना भारतीय  संघाने तब्बल 222 धावांनी जिंकला होता. सुनील गावसकर यांच्या शतकी खेळी शिवाय भागवत चंद्रशेखर यांनी 20 षटकात 52 धावा खर्च करुन 6 विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या मालिकेतील चौथ्या सामन्यातही भारताने एक डाव आणि 2 धावांनी यजमानांना नमवून मालिका बरोबरीत नेली. पण भारतीय संघाला अखेरचा सामना मुकावा लागला होता. 

ऑस्ट्रेलियाला दुखापतीची साडेसाती कायम; आता वेगवान गोलंदाज सिन ऍबॉट जखमी
  
7-11 फेब्रुवारी 1981 (मेलबर्न)
1981 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कांगारुंविरुद्धच्या 3 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली होती.  7-11 फेब्रुवारी दरम्यान मेलबर्नच्या मैदानात झालेल्या तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 59 धावांनी पराभूत केले होते. विश्वनाथ गुंडाप्पा यांच्या शतकाच्या जोरावार (114) भारताने हा सामना जिंकला होता. विश्वनाथ यांनी आपल्या कारकिर्दीत 14 कसोटी शतके झळकावली. त्यांनी शतक झळकावल्यालेल्या 13 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे. केवळ एक सामना भारताला जिंकता आलेला नाही.    
 
12-16 डिसेंबर 2003 (ऍडलेड)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या अविस्मरणीय सामन्यापैकी एक कसोटी सामना हा 2003 मध्ये ऍडलडच्या मैदानात रंगला होता. या सामन्यात दोन्ही संघांनी 500+ धावा केल्या होत्या. राहुल द्रविड आणि लक्ष्मण यांनी या सामन्यात अविस्मरणीय खेळी केली. पहिल्या डावात द्रविडने 233 आणि लक्ष्मणने 148 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात द्रविड 43 धावांवर नाबाद राहिला होता. आगरकरने 6 तर तेंडुलकरने 2 विकेट घेऊन भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. हा सामना भारताने 4 विकेट्सनी जिकला होता.  

16-19 जानेवारी 2008 (पर्थ) 

2008 मध्ये भारताने केलेला ऑस्ट्रेलिया दौरा मंकीगेट प्रकरणाने चांगलाच गाजला होता. पर्थच्या मैदानात अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने कांगारुंना 72 धावांनी पराभूत केले होते. इरफान पठाणने या सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर भारताला विजय मिळाला होता. अखेरचा सामना अनिर्णत ठेवण्यात टीम इंडियाला यश आले होते. ही मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी जिंकली होती. 

6-10 डिसेंबर 2018 (ऍडलेड) 

दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहासल रचला होता. भारताने कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली होती. ऍडलेडच्या मैदानातील सलामीच्या कसोटी सामन्यात पुजाराने महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. भारताने हा सामना तब्बलव 137 धावांनी जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात नॅथन लायनच्या जोरावर कांगारुंनी कमबॅक केले. पण त्यानंतर बुमराहच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली. शेवटचा सामना अनिर्णित राखत भारताने ही मालिका जिंकली होती.  


​ ​

संबंधित बातम्या