AUSvsIND : क्लीन स्वीप टाळण्यासाठी कोहली संघात बदल करणार का? 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना कॅनबेरा येथे खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना कॅनबेरा येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 ने आघाडी घेत ही एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली होती. त्यानंतर आता विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात व्हाईटवॉश पासून वाचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे तिसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. 

विराट कोहली सचिनचा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठयावर 

ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये खूपच महाग पडल्याचे दिसून आले. त्याशिवाय नवदीप सैनीकडून देखील कोणती विशेष कामगिरी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात या दोन्ही खेळाडूंपैकी एकाला वगळण्यात येऊ शकते. कारण सध्या भारतीय संघात शार्दुल ठाकूर, टी-नटराजन आणि कुलदीप यादवसारखे गोलंदाज आहेत, आणि त्यांचा तिसर्‍या सामन्यामध्ये समावेश होऊ शकतो. 

बुमराहने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 20 षटके टाकली असून, त्याने 152 धावा दिल्या आहेत. शिवाय बुमराह हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असल्यामुळे त्याला बाहेर ठेवण्याची शक्यता कमी आहे. तर, मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनीच्या जागी ती नटराजन यांचा समावेश होऊ शकतो. याशिवाय चहलऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकते. 

"रोहितशिवाय वनडेत 350+धावा करणे मुश्किल"

त्यानंतर फलंदाजीचा विचार केल्यास मयांक अग्रवालच्या जागी मनीष पांडेलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे. मनीष पांडेला मयांक अग्रवालपेक्षा अधिक अनुभव असल्यामुळे त्याला ही संधी मिळू शकते. आणि केएल राहुल सलामीवीर म्हणून देखील खेळण्याची शक्यता आहे.  

 


​ ​

संबंधित बातम्या