विराट बाबत योगायोग; तब्बल 8 वर्षानंतर, त्याच मैदानावर, त्याच टीम विरुद्ध... (Video)    

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नेहमीच संघ अडचणीत असताना आपल्या फलंदाजीने स्वतःला सिद्ध केले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नेहमीच संघ अडचणीत असताना आपल्या फलंदाजीने स्वतःला सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात आज पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळाले. विराट कोहली चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना झाल्यानंतर विराट पुन्हा मायदेशी परतणार आहे. आणि त्यामुळे त्याला पहिल्या कसोटी सामन्याचे महत्व चांगलेच ठाऊक आहे. आणि म्हणूनच पहिल्या दिवशी पहिल्या डावात त्याने चार तासापेक्षा जास्त वेळ फलंदाजी केली आणि अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला बाहेर काढले. मात्र आज विराट ज्याप्रमाणे बाद झाला असे अनेक वर्षांनी घडल्याचे पाहायला मिळाले. 

पॅटर्निटी लिव्हबाबत दादा विराटच्या पाठीशी

भारतीय संघाचे सलामीवीर झटपट बाद झाल्याचे आज पाहायला मिळाले. मागील काही सामान्यांपासून धावा करण्यात अपयशी ठरत असलेला पृथ्वी शॉ आज देखील फ्लॉप झाला. त्याला मिचेल स्टार्कने अवघ्या शून्य धावावर बाद केले. त्यानंतर मयांक अग्रवालला पॅट कमिन्सने आऊट केले. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजाराने कर्णधार विराट कोहली सोबत भागीदारी करत डावाला सावरले. विराट कोहलीने बाद होण्यापूर्वी 180 चेंडूंचा सामना केला आणि आठ चौकारांसह 74 धावा केल्या.

कर्णधार विराट कोहली फलंदाजी करत असताना त्याच्या सोबत अजिंक्य रहाणे मैदानात होता. आणि डावाच्या 77 व्या षटकातील शेवटचा बॉल लियॉनने टाकला. व यावेळेस स्ट्राईकवर असलेल्या अजिंक्यने ऑफ फिल्डरकडे ड्राईव्ह मारत एकेरी धाव घेण्यासाठी काही पावले पुढे आला. व अजिंक्य रहाणे कडे पाहून विराट कोहली देखील धाव घेण्यासाठी पळाला. आणि विराट क्रिझच्या मध्यापर्यंत पोहचला असताना अजिंक्य रहाणेने धाव घेण्यास नकार दिला. मात्र तोपर्यंत चेंडू हेझलवूडने अडवून त्याने थ्रो लियॉनकडे सोपवला. आणि  लियॉनने देखील क्षणाचाही विलंब न करत विराट कोहलीला धावबाद केले. 

विराटचे 'सेंच्युरी पॅचअप' मुश्किलच!

आजच्या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहली बाद झाल्यामुळे 8 वर्षात 86 कसोटी सामन्यांमध्ये केवळ दुसऱ्या वेळेस विराट धावबाद झाला. आणि विशेष म्हणजे 2012 मध्ये विराट कोहली अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानातच कसोटी सामन्यात धावबाद झाला होता. 2012 मध्ये विराट कोहली सामन्याच्या दुसऱ्या डावात 22 धावांवर असताना धावबाद झाला होता. आजच्या दिवशीच्या खेळात विराटच्या नंतर अजिंक्य रहाणे देखील मिचेल स्टार्कच्या चेंडूवर 42 धावांवर पायचीत झाला. व हनुमा विहारीला जोश हेझलवूडने 16 धावांवर माघारी धाडले. त्यामुळे पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा केलेल्या आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या