विराट कोहली सचिनचा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठयावर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारताला गमवावा लागला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारताला गमवावा लागला. मात्र या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार खेळी केली. त्याने 87 चेंडूंचा सामना करताना 89 धावा केल्या. तसेच या सामन्यात विराटने  78 धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 22 हजार धावा पूर्ण केल्या. व याव्यतिरिक्त विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 22 हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे. त्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना उद्या खेळवण्यात येणार आहे. आणि या सामन्यात विराटची नजर सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर असणार आहे. 

पॅटर्निटी लीववर 'विराट' चर्चा, गावसकरांचा मास्टर स्ट्रोक तर कपिल...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना उद्या कॅनबेरा येथे होणार आहे. आणि पहिले दोन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने मालिका गमावली असून, आता शेवटच्या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या संघावर विजय मिळवून व्हाईटवॉशच्या संकातून वाचू शकते. त्याशिवाय या सामन्यात विराट कोहलीने फलंदाजी करताना फक्त 23 धावा केल्यास तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली एकदिवसीय सामन्यात 12 हजार धावा करणारा वेगवान फलंदाज बनू शकतो. 

ऑस्ट्रेलिया सोबतच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात कोहलीने 23 धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा वेगवान फलंदाज होईल. हा विक्रम भारतीय दिग्गज सचिनच्या नावावर आहे. सचिनने 309 सामने खेळून ही कामगिरी केलेली आहे. तर कोहलीने आतापर्यंत फक्त 250 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. आणि तो या विक्रमाजवळ पोहचलेला आहे. विराटने 241 डावात 59.29 च्या सरासरीने एकूण 11977 धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात कोहलीने फक्त 23 धावा केल्यास तो हा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो. 

AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे 

याव्यतिरिक्त, आतापर्यंत फक्त पाच खेळाडूंनी एकदिवसीय क्रिकेट मध्ये 12 हजार हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ज्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरचा प्रथम क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिग, श्रीलंकेचा कुमार संगकारा, सनथ जयसूर्या आणि माहेला जयवर्धने यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे विराटचा देखील या खेळाडूंच्या पंक्तीत समावेश होईल.       


​ ​

संबंधित बातम्या