Test Captaincy  Record : किंग कॅप्टनच्या नावे झाला नकोसा विक्रम

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 19 December 2020

2015 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर  ऑस्ट्रेलिया विरुद्धच विराट कोहली नियमित कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. कोरोना संकटापूर्वी टीम इंडियाने कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला 2-0 असा पराभव पत्करावा लागला होता. 

AUS vs IND Virat Kohli Test Captaincy  Record : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघावर पराभावाची नामुष्की ओढावली. दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या पराभवामुळे विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम नोंद झालाय. सातत्याने तीन कसोटी सामने गमावण्याची वेळ कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला आली. 

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि यावर्षी न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना खेळला. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या पदरी निराशा पदरी आली होती. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी सामना गमावला आहे. सलग तीन कसोटी सामने गमावण्याची वेळी कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघावर ओढावली. 

AusvsIND 1st Test Day 3 :टीम इंडियाचे शेर तिसऱ्याच दिवशी ढेर! कांगारुंची मालिकेत 1-0 आघाडी

2015 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर  ऑस्ट्रेलिया विरुद्धच विराट कोहली नियमित कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. कोरोना संकटापूर्वी टीम इंडियाने कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला 2-0 असा पराभव पत्करावा लागला होता. 

AUS vs IND : 9 8 4 4 4 2 0 0 0 4 मोबाईल नंबर नव्हे.. हे तर टीम इंडियाचं स्कोअरकार्ड!

न्यूझीलंड विरुद्धच्या मानहानीकारक पराभवापूर्वी कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग सात कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला होता. यात वेस्ट इंडिज दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांसह दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्धच्या सामन्यांचा समावेश होता. या सात सामन्यात कोलकाताच्या मैदानात पिंक बॉल कसोटी जिंकण्याचा पराक्रमही टीम इंडियाने केला होता. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 56 कसोटी सामने खेळले आहेत. यात 33 सामन्यात विजय 13 सामन्यात पराभव तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या