ICC Test Rankings: विराटची प्रगती; पण स्मिथ घसरुनही आघाडीवर

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे.

एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. आणि यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत अर्धशतकीय खेळी केली होती. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजांच्या ताज्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असेलला विराट कोहली पहिल्या क्रमांकावरील स्टीव्ह स्मिथच्या जवळ पोहचला आहे. 

''स्विंग होणाऱ्या चेंडूवर नांगी टाकणे ही भारतीय फलंदाजांची परंपराच...

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने 74 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहलीच्या खात्यात दोन अंक जमा झाले आहेत. व सध्या त्याचे 888 अंक झाले असून तो या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर या सामन्यात फारशी कमाल दाखवू न शकलेल्या स्टीव्ह स्मिथचे 10 अंक कमी झाले आहेत. मात्र तो पहिल्या स्थानी कायम असून, त्याचे 901 गुण झालेले आहेत. यामुळे विराट कोहली स्टीव्ह स्मिथच्या अगदीच जवळ पोहचला आहे. परंतु मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांमध्ये विराट कोहली खेळणार नाही. तर स्टीव्ह स्मिथ या तीनही सामन्यांमध्ये मैदानात उतरणार आहे. आणि तो यातील काही सामन्यांमध्ये चांगली खेळी करू शकतो.   

याशिवाय, पहिल्या डावात 46 धावा आणि दुसऱ्या डावात सहा धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या लबूशेनने देखील या क्रमवारीत प्रगती केलेली आहे. फलंदाजांच्या ताज्या कसोटी क्रमवारीत लबूशेनचे 839 अंक झालेले आहेत. व त्यामुळे तो न्यूझीलंडच्या केन विलियम्सन सोबत चौथ्या स्थानावर आरूढ झालेला आहे. याव्यतिरिक्त, पहिल्या सामन्यात नावाला साजेशी खेळी करू न शकलेला चेतेश्वर पुजाराला क्रमवारीत फटका बसला आहे. चेतेश्वर पुजारा सातव्या नंबरवरून आठव्या स्थानी घसरला आहे. तर अजिंक्य रहाणे पहिल्या दहामधून बाहेर फेकला गेला आहे. अजिंक्य रहाणे अकराव्या स्थानी पोहचला आहे. 

AUS vs IND : कमबॅक करण्यासाठी भारतीय संघात दिसू शकते बदलाचे वारे 

तसेच, सामन्याच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना आर अश्विनने कमाल करत चार बळी टिपले होते. त्यामुळे आयसीसी गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत आर अश्विनने जसप्रीत बुमराहला मागे टाकत नवव्या स्थानावर झेप घेतली असून, बुमराहची दोन स्थानाने घसरण होऊन तो दहाव्या स्थानी आला आहे. वेस्ट इंडीज संघाचा गोलंदाज जेसन होल्डर आणि बुमराहचे अंक समान असल्यामुळे हे दोघेही दहाव्या स्थानावर आहेत.            

 

   


​ ​

संबंधित बातम्या