AUSvsIND: किंग कोहली अजिंक्यवर फिदा; नाबाद शतकी खेळीची केली विराट स्तुती

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 27 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांपैकी दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांपैकी दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघाने दमदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिला डावात 195 धावांवर रोखले होते. यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया समोर 82 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचे कार्यवाहक म्हणून कर्णधारपद स्वीकारणाऱ्या अजिंक्य रहाणेने बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतकी खेळी करत आपली फलंदाजीची धार दाखविली.

ICC Decade Team: दशकातील भारी कॅप्टन धोनीच; विराटला मिळाला कसोटीचा ताज

अजिंक्य रहाणेच्या खेळीमुळे दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहचली आहे. अजिंक्य रहाणेने 200 चेंडूंमध्ये 12 चौकारांसह नाबाद 104 धावा केलेल्या आहेत. अजिंक्य रहाणेच्या या खेळीने भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला देखील आनंद झाला आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावरील ट्विटरवर ट्विट करत अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे. भारतीय संघाचा दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीने ट्विटरवर भारतीय संघासाठी अजून एक चांगला दिवस असे किहिले आहे. तसेच टेस्ट क्रिकेट सध्याच्या वेळी बेस्ट असल्याचे म्हणत विराट कोहलीने प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खेळीची स्तुती केली आहे. जिन्क्सने केलेला सर्वोत्तम खेळी असे विराट कोहलीने म्हटले आहे.      

AUSvsIND: शतकीय खेळी करत अजिंक्यने केली रोहित व मयांक अग्रवालची बरोबरी  

यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यातील पहिल्या दिवशीच्या खेळानंतर देखील विराट कोहलीने असेच काहीसे ट्विट केल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्या दिवशीच्या खेळात भारतीय संघातील गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. व त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ लवकरच आटोपला होता. त्यामुळे विराट कोहलीने भारतीय संघातील गोलंदाजांचे कौतुक केले होते. 

दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेनचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी फोल ठरवला होता. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला धक्का दिला होता. त्यानंतर अश्विनच्या फिरकीतील जादू पाहायला मिळाली होती. त्यामुळे पहिल्या सामन्यात आघाडी घेतलेला कांगारुंचा संघ दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच पिछाडीवर राहिला. बुमराहने सर्वाधिक 4 अश्विनने 3 तर मोहम्मद सिराजने पदार्पणाच्या सामन्यात 2 विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत मोलाचे योगदान दिले होते. 


​ ​

संबंधित बातम्या