''विराट कोहलीसाठी बऱ्याच योजना आखल्या आहेत'' 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 16 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून अ‍ॅडिलेडच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून अ‍ॅडिलेडच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी यजमान कांगारू कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने मोठा दावा केला आहे. टीम पेनने भारतीय संघासाठी डावपेच आखल्याचे सांगत, कर्णधार विराट कोहलीची आपल्याला चिंता नसल्याचे म्हटले आहे. 

AUSvsIND : पिंक बॉल सामन्यासाठी विराट सेनेची घोषणा 

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना टीम पेनने प्रत्येक संघाकडे प्रतिस्पर्धी संघातील दमदार खेळाडूला रोखण्यासाठी रणनीती असते. आणि आपल्याकडे देखील विराट कोहलीला रोखण्यासाठी अशा प्रकारची रणनीती असल्याचे त्याने सांगितले. याशिवाय विराट कोहली हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. मात्र त्याच्या विरुद्ध एकच रणनीती नाहीतर, बऱ्याच योजना आखल्याचे टीम पेनने म्हटले आहे. 

याशिवाय, ऑस्ट्रेलियन संघातील गोलंदाजीची विविधता विराट कोहलीला त्रास देण्यासाठी पुरेशी असल्याचे मत टीम पेनने या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघात भिन्न प्रकारचे गोलंदाज आहेत. आणि याचा संघाला मोठा फायदा होणार असल्याचे टीम पेन म्हणाला. आणि त्यामुळे भारतीय फलंदाजांना रोखता येणार असल्याचे त्याने नमूद केले. नॅथन लिऑन, कॅमेरून ग्रीन यांच्याशिवाय लबूशेन हे संघात असल्यामुळे भारतीय संघाला धावसंख्या उभारणे कठीण जाणार असल्याचे टीम पेनने सांगितले. 

वृद्धिमन साहाऐवजी पंतला संधी द्या - सुनील गावसकर 

तसेच, मिशेल स्टार्कने संघात पुनरागमन झाले असल्यामुळे संघ अधिक बळकट झाल्याचे टीम पेनने यावेळेस सांगितले. कारण डे नाईट कसोटी सामन्यात गुलाबी चेंडू वापरला जातो. आणि मिशेल स्टार्क हा यात पारंगत असल्याचे टीम पेन म्हणाला. मिशेल स्टार्कच्या गुलाबी चेंडूचा सामना करणे आणि ते देखील कसोटी सामन्यात अवघड असल्याचे त्याने अधोरेखित केले. मिशेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना सात डे नाईट कसोटी सामन्यात मिळून 42 बळी टिपले आहेत.           


​ ​

संबंधित बातम्या