AUSvsIND : रिषभ पंतचा झेल टिपताच टीम पेनच्या नावावर झाला विक्रम  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 27 December 2020

ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार टीम पेनने मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतासोबत चालू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नवा विक्रम केला आहे.

ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार टीम पेनने मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतासोबत चालू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नवा विक्रम केला आहे. टीम पेन कसोटी क्रिकेट मध्ये 150 बळी टिपणारा वेगवान विकेटकीपर ठरला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार असलेल्या टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाला सर्वबाद केले होते. 

AUSvsIND : तिसऱ्या कसोटी सामन्यावर अनिश्चितीचे काळे ढग 

ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्याच दिवशी पहिल्या डावात सर्व बाद केल्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला. व त्यानंतर पेनने आतापर्यंत तीन झेल घेतले आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर आणि आपल्या कारकिर्दीतील पहिलीच कसोटी खेळत असलेल्या शुभमन गिलचा झेल टीम पेनने पकडला. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांचे देखील पेनने झेल घेतले. रिषभ पंतचा झेल घेताच टीम पेनच्या नावावर कसोटीत वेगवान बळी टिपण्याचा रेकॉर्ड झाला. 

AUSvsIND: किंग कोहली अजिंक्यवर फिदा; नाबाद शतकी खेळीची केली विराट स्तुती

याशिवाय, टीम पेनने हा विक्रम फक्त 33 कसोटी सामन्यांमध्ये पूर्ण केला आहे. व यात त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकला मागे टाकले आहे. क्विंटन डी कॉकने 34 सामन्यांमध्ये खेळताना ही कामगिरी पार पाडली होती. त्यानंतर अ‍ॅडम गिलक्रिस्टने विकेटकिपर म्हणून 36 सामन्यांमध्ये 150 बळी मिळवले होते. तर मार्क बाउचरने 38, रॉड मार्शने 39 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता. 


​ ​

संबंधित बातम्या