AUSvsIND 3rd Test : जे ठरलं तसेच होणार; सामना सिडनीतच

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात आला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशातील तिसरा कसोटी सामना सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर अनिश्चितीची टांगती तलवार निर्माण झाली होती. पण आता हा सामना सिडनीतच खेळवण्यात येणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. 

AUSvsIND: पराभव पत्कराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला आयसीसीचा दे धक्का  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान सिडनीत खेळवण्यात येणार आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकारणांमुळे स्थानिक प्रशासनाने हाय अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडनीच्या उत्तर भागात देखील कोरोनाचा प्रभाव वाढू लागलेला आहे. आणि त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे तिसरा कसोटी सामना इतरत्र हलविण्याची शक्यता असल्याचे याअगोदर सांगितले होते. परंतु आता हा कसोटी सामना नियोजित वेळापत्रकानुसार सिडनीतच खेळवण्यात येणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे. 

ICC World Test Championship:टीम इंडियाची सुधारणा; पराभूत होऊनही ऑस्ट्रेलिया...

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी, कोरोनाजन्य परिस्थितीत सामन्याचे आयोजन करणे हे आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे. परंतु नवीन वर्षातील पहिला सामना सिडनीतच होत असल्याने याचा आनंद देखील असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय खेळाडूंच्या सुरक्षततेसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आल्याचे निक हॉकले यांनी यावेळी नमूद केले. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍडिलेड येथे झालेल्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला आहे. आणि आता तिसरा कसोटी सामना ठरलेल्या नियोजनानुसार सिडनीच्या मैदानावर होणार असून, शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे होईल.         


​ ​

संबंधित बातम्या