AUSvsIND : पिंक बॉल सामन्यासाठी विराट सेनेची घोषणा 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 16 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेनंतर आता या दोन्ही देशांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेनंतर आता या दोन्ही देशांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्या पासून अ‍ॅडिलेड येथे होणार आहे. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांमध्ये होणार हा पहिला सामना डे नाईट असेल. त्यानंतर या सामन्यासाठी भारतीय संघाने आज प्लेयिंग इलेव्हनची घोषणा केलेली आहे.

फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर हिटमॅन अखेर ऑस्ट्रेलियासाठी रवाना 

भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंची घोषणा करताना, सराव सामन्यात चांगली कामगिरी करूनही शुभमन गिलला टीम इंडियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने यष्टीरक्षणाची जबाबदारी वृद्धिमान साहाकडे सोपवली आहे. याशिवाय या सामन्यासाठी नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराजल ऐवजी अनुभवी उमेश यादवला प्राधान्य देण्यात आले आहे. 

याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा मैदानात उतरू शकणार नाही. त्यामुळे या दोन्ही सामन्यात मयांक अग्रवाल सोबत संघाची सुरवात कोण करणार हा प्रश्न काही दिवसांपासून उपस्थित करण्यात येत होता. त्यानंतर सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंड दौर्‍यानंतर पृथ्वी शॉ मोठी खेळी करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत पृथ्वी शॉला नावाला साजेशी खेळी करता आली नव्हती. परंतु असे असूनही संघ व्यवस्थापनाने शॉवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. आणि त्यामुळे शुभमन गिलला पदार्पण करण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.    

वृद्धिमन साहाऐवजी पंतला संधी द्या - सुनील गावसकर 

त्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघाची गोलंदाजी लक्षात घेऊन भारतीय संघ व्यवस्थापनाने सहा फलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. तसेच तो पार्ट टाइम ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करू शकतो. हनुमा विहारीसह पृथ्वी शॉने देखील गोलंदाजीचा सराव केला असल्यामुळे तो सुद्धा अर्धवेळ गोलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. यानंतर कुलदीप यादवच्या जागी आर अश्विनला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली असून, त्याच्या सोबत वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीवर असणार आहे. 

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - 
मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, आर.के. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.


​ ​

संबंधित बातम्या