AUSvsIND : रोहितसह पाचजणांना घेऊनच टीम इंडिया सिडनीला जाणार 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 3 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरुवार पासून सिडनीत खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी सावधगिरी म्हणून क्वारंटाईन केलेल्या पाच खेळाडूंसह संपूर्ण भारतीय संघ सोमवारी मेलबर्न मधून सिडनीच्या दिशेने रवाना होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरुवार पासून सिडनीत खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी सावधगिरी म्हणून क्वारंटाईन केलेल्या पाच खेळाडूंसह संपूर्ण भारतीय संघ सोमवारी मेलबर्न मधून सिडनीच्या दिशेने रवाना होणार आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी भारतीय संघात सामील झालेला उपकर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांच्याविरूद्ध जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी चालू राहणार आहे. मात्र आगामी सामन्याच्या ठिकाणी ते देखील उर्वरित संघासोबतच रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

क्वारंटाईन होणार असाल तरच खेळायला या; टीम इंडियाला इशारा

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रोहित शर्मासह पाच जणांनी एका रेस्टोरेंटमध्ये जेवणासाठी गेल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघातील पाच जणांनी रेस्टोरेंटमध्ये जाऊन जेवण केले होते. व एका भारतीय चाहत्याने त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. या घटनेवर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आज स्पष्टीकरण देताना, याचा तपास भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (बीसीसीआय) करत असल्याचे सांगितले आहे. 

तर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने ही घटना कोणत्याही नियमाचे उल्लंघन असल्याचे कधीही म्हटले नसून, त्यांनी फक्त हे उल्लंघन आहे की नाही याबाबत शंका उपस्थित केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. आणि त्यामुळे या पाच खेळाडूंना इतर संघासामवेत सिडनीला जाण्यासाठी रोखण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतीय संघ उद्या ऑस्ट्रेलिया सोबतच्या तिसऱ्या कसोटी साठी सिडनीला रवाना होणार आहे. 

मात्र, तिसऱ्या कसोटी नंतर आता दोन्ही देशांमध्ये खेळवण्यात येणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 15 ते 19 जानेवारी दरम्यान ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. आणि या सामन्यापूर्वी भारतीय संघाला कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करणार असल्यासच ब्रिस्बेनला यावे. अन्यथा येऊ नये असे विधान स्थानिक प्रशासनाच्या आरोग्य मंत्री रोस बेट्स यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला सुरवात झाली आहे. 

AUSvsIND : हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर होऊ शकतो नवा विक्रम

राज्याच्या आरोग्य मंत्री रोस बेट्स यांनी ऑस्ट्रेलियन चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टीम इंडियाला इशारा दिला आहे. यामध्ये भारतीय संघाला जर नियमानुसार खेळायचे नसेल तर त्यांनी इकडे येऊच नये, असे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. क्वींसलंडच्या क्रीडा मंत्र्यांनीही आरोग्य मंत्र्यांच्या सूरात सूर मिसळत टीम इंडियाला गाईड लाइन्स फॉलो कराव्याच लागतील, असे म्हटले आहे. सर्वांना एकसारखेच नियम आहेत, असा उल्लेखही क्वींसलंड सरकारच्या मंत्र्यांनी केलाय.     


​ ​

संबंधित बातम्या