AUSvsIND 3 T20: टीम इंडियाची क्लीन स्विपची संधी हुकली; कांगारूंचा विजय 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

सलामीवीरांच्या फ्लॉप शोनंतर कोहलीने एकाकी झुंज देत केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली आहे.

सलामीवीरांच्या फ्लॉप शोनंतर कोहलीने एकाकी झुंज देत केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली आहे. मालिका गमावलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला रोखत मालिकेचा शेवट गोड केला. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्यांनी 12 धावांनी विजय नोंदवला. 186 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मॅक्सवेलने लोकेश राहुलला खातेही उघडू दिले नाही. स्वेपसनने शिखर धवनला 28 धावांवर चालते केले. संजू  सॅमसन (10) श्रेयस अय्यर (0) हार्दिक पांड्या 20 धावा करुन परतल्यानंतर दुसऱ्या बाजूने विराटने एक बाजू लावून धरली. अँड्र टायने त्याला 85 धावांवर बाद करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळवला. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर टीम इंडियाला निर्धारित 20 षटकात 174 धावांपर्यंत मजल मारता आली. 

AUSvsIND 3 T20: अर्धशतकाच्या खेळीसह मॅथ्यू वेडने केला नवा विक्रम  

मॅथ्यू हेडच्या 53 चेंडूतील 80 धावा आणि मॅक्सवेलच्या 36 चेंडूतील 54 धावांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात टीम इंडियासमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्याची वेळ आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली.

हार्दिक पांड्या हा धोनी आणि युवराज सिंग सारखा फलंदाज 

कर्णधार फिंचला वाशिंग्टन सुंदरने खातेही उघडू दिले नाही.  14 धावांवरच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. त्यानंतर मैदानात आलेला फिंच 24 धावा करुन माघारी फिरला वाशिंग्टन सुंदरनेच त्याला बाद केले. त्यानंतर मॅक्सवेल आणि वेड या जोडीनं संघाच्या डावाला आकार दिला. दोघांनी 90 धावांची भागीदारी रचली. शार्दूल ठाकूरने फिंचला 80 धावांवर बाद केले. त्यानंतर नटराजनने 54 धावांवर खेळणाऱ्या मॅक्सवेलच्या खेळीला ब्रेक लावला. हेन्रिक्सच्या 5 आणि शॉर्टच्या 7 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 4 बाद 186 धावांपर्यंत मजल मारली होती.


​ ​

संबंधित बातम्या