AUSvsIND : टी-ट्वेन्टी मालिका विजयानंतर टीम इंडियाला धक्का बसण्याची शक्यता 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

भारतीय संघाने दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघावर विजय मिळवत मालिकेत 2 - 0 ने आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघावर विजय मिळवत मालिकेत 2 - 0 ने आघाडी घेतली आहे. तर पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात देखील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या संघावर विजय मिळवला होतो. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा जखमी झाला होता. व त्यामुळे त्याला दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र आता रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

AUSvsIND T20: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात फलंदाजी करताना रवींद्र जडेजाच्या डोक्याला दुखापत झाली होती. तसेच या सामन्यात त्याला हॅमस्ट्रिंगचा देखील त्रास झाला होता. त्यामुळे या दुखापतीतून सावरण्यासाठी जडेजाला कमीत कमी तीन आठवड्यांसाठी मैदानाबाहेर रहावे लागण्याची शक्यता आहे. तर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून अ‍ॅडिलेड येथे खेळवण्यात येणार आहे. शिवाय हॅमस्ट्रिंगची दुखापत गंभीर बनल्यास 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात देखील रवींद्र जडेजाला उतरता येणार नाही. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या कन्कशन नियमाअंतर्गत एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाल्यास त्याला सात ते दहा दिवस विश्रांती दिली जाते. आणि त्यामुळे 11 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात जडेजाला मैदानात उतरता येणार असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय जडेजाला डोक्याच्या दुखापतीपेक्षा हॅमस्ट्रिंगचा अधिक त्रास होत असल्याची माहिती मिळाली आहे. 

AUSvsIND 2 T20 : सर्वाधिक धावा देऊन देखील चहलने केला विक्रम  

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिल्या सराव सामन्याच्या अगोदर रवींद्र जडेजा कन्कशनच्या दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी बाहेर राहणार असल्याचे समालोचकाने म्हटले होते. तर भारतीय बोर्डाने जडेजा हा डोक्याच्या दुखापतीतून सावरला असून, हॅमस्ट्रिंगमध्ये सावरण्यासाठी त्याला अधिक वेळ लागू शकतो, असे म्हटले आहे.       


​ ​

संबंधित बातम्या