AUSvsIND T20: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा रेकॉर्ड  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-ट्वेन्टी सामन्यांपैकी पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत टीम इंडियाने मालिका आपल्या खिशात घातली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-ट्वेन्टी सामन्यांपैकी पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत टीम इंडियाने मालिका आपल्या खिशात घातली आहे. व यासोबतच भारतीय संघाने एकदिवसीय मालिका गमावल्याचा वचपा देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून वसूल केला आहे. आज झालेल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकांत पाच गडी गमावत 194 धावा केल्या होत्या. तर भारताच्या संघाने दोन चेंडू शिल्लक असतानाच चार गडी गमावत 195 धावांचे लक्ष्य गाठले. शिवाय या विजयाबरोबरच भारतीय संघाने पाकिस्तानचा एक रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केला आहे. 

AUSvsIND 2 T20 : सर्वाधिक धावा देऊन देखील चहलने केला विक्रम  

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात दमदार कामगिरी करत विजय मिळवला होता. तर त्याच्यानंतर आज झालेल्या सामन्यात देखील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 धावांचे डोंगर पार करत सामना आपल्या खिशात घातला आहे. व या विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या संघाने केलेल्या विक्रमाला मागे टाकले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला नमवत आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आपला सलग दहावा विजय प्राप्त केला आहे. तर पाकिस्तानने यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेट मध्ये सलग नऊ सामने जिंकले होते. 

AUSvsIND 2 T20 : शिखर धवनचा विक्रम; सुरेश रैनाला टाकले मागे

पाकिस्तानच्या संघाने जुलै 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत हरारे येथे झालेल्या टी-ट्वेन्टी ट्राय सीरिज मध्ये झिम्बाब्वेच्या संघाला एक वेळा आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोन वेळा पराजित केले होते. आणि त्यानंतर युएईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संघाला तीन-तीन वेळा हरवले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेट मध्ये सलग नऊ सामने जिंकण्याचा कारनामा केला होता. तर भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाचा हा रेकॉर्ड मोडलेला आहे. मागील एक वर्षात विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने एकाही टी-ट्वेन्टी सामन्यात पराभव पत्करलेला नाही. 

भारतीय संघाने डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध आपला पहिला टी-ट्वेन्टी सामना जिंकला होता. त्यानंतर 2020 मध्ये भारतातच श्रीलंकेविरुद्ध पहिली टी-ट्वेन्टी मालिका खेळली होती. यातील पहिला सामना गुवाहाटी मध्ये पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर पुढील दोन सामने पुणे आणि इंदोर येथे भारताने जिंकले होते. यानंतर न्यूझीलंडच्या दौर्‍यावर भारताने 5-0 ने मालिकाच आपल्या खिशात घातली होती. त्यापैकी दोन सामने सुपर ओव्हरमध्ये भारताने जिंकले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवून पाकिस्तानशी बरोबरी साधली होती. आणि आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. 

याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेट मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने सलग बारा सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यांनी 2018 ते 2019 पर्यंत अकरा  सामने जिंकलेले आहेत. आणि भारताने ऑस्ट्रेलियासोबतच तिसरा टी-ट्वेन्टी सामना जिंकला तर ते अफगाणिस्तानच्या संघाशी बरोबरी साधतील. 


​ ​

संबंधित बातम्या