आगामी कसोटीसाठी गावस्करांनी सुचवले बदल; वाचा कोण होणार आऊट  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना नवीन वर्षात सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना नवीन वर्षात सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला डे नाईट सामना ऑस्ट्रलियाने तर दुसरा बॉक्सिंग डे सामना भारतीय संघाने जिंकला होता. त्यामुळे टीम इंडियाने मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाशी बरोबरी साधली आहे. याशिवाय आगामी दोन्ही सामन्यांसाठी सलामीवीर रोहित शर्मा आजच भारतीय संघात सहभागी झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरवात रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या दोघांनी करावी, असा सल्ला भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी केला आहे. 

AUSvsIND : गावस्करांनी सांगितले टीम इंडियाच्या विजयाचे रहस्य 

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या तेराव्या हंगामात पहिले काही सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा दुखापग्रस्त झाला होता. आणि त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय, टी-ट्वेन्टी मालिकेला मुकावे लागले होते. याशिवाय पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी देखील हिटमॅन अनुपस्थित राहिला होता. आणि त्यानंतर फिट झाल्यावर रोहित शर्मा उर्वरित दोन सामन्यांसाठी मेलबर्न येथे पोहोचला आहे. मात्र त्याच्या संघात आल्यामुळे भारतीय संघाच्या सध्याचा प्लेयिंग इलेव्हन मधील एका खेळाडूला बाहेर व्हावे लागणार आहे. 

रोहित शर्मा संघात आल्यावर दुसऱ्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलेल्या शुभमन गिलला तिसऱ्या स्थानी खेळण्याचे मत माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. तर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरवात करून, मागील काही सामान्यांपासून अपयशी ठरत असलेल्या हनुमा विहारीला वगळण्याचे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. याअगोदरच्या काही सामन्यांमध्ये मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी हे मोठी खेळी करू शकलेले नाहीत. मात्र मयांकला अजून एक संधी देणे गरजेचे असल्याचे सुनील गावस्कर यांनी सांगितले. तर रोहित शर्माच्या संघातील समावेशामुळे टीम इंडियाचे मनोबल देखील उंचावणार असल्याचे सुनील गावस्कर यांनी नमूद केले. 

हिटमॅनच्या आगमनाने टीम इंडियाच्या ताफ्यात दिसला जल्लोष; पहा व्हिडिओ  

दरम्यान, ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांच्याकडून धावा होत नसल्याचे पाहायला मिळाले होते. मयांक अग्रवालने दोन्ही सामन्यात मिळून 31 आणि हनुमा विहारीने 45 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या डावाची सुरवात अतिशय खराब झाल्याचे पाहायला मिळाले होते.         


​ ​

संबंधित बातम्या