''पहिल्या सामन्यात सलामीवीर म्हणून शुभमन गिल हा योग्य पर्याय''  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रत्येकी तीन-तीन एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेनंतर आता चार सामन्यांची कसोटी मालिका येत्या गुरवार पासून खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रत्येकी तीन-तीन एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेनंतर आता चार सामन्यांची कसोटी मालिका येत्या गुरवार पासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाला कसोटी मालिका सुरू करावी लागणार आहे. आणि रोहित शर्मा नसल्यामुळे मयांक अग्रवाल सोबत भारतीय संघाच्या डावाची सुरवात कोण करणार हा प्रश्न देखील मागील काही दिवसांपासून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र यावर आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी आपले मत व्यक्त केले असून, सलामीवीर म्हणून शुभमन गिल हा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.   

महिला वर्ल्डकपची तारीख ठरली; जाणून घ्या भारतीय संघाचे वेळापत्रक

अ‍ॅलन बॉर्डर ट्रॉफीसाठी घेण्यात आलेल्या सराव सामन्यात शुभमन गिलने मयांक अग्रवालसोबत भारतीय संघाचा डावाची सुरवात करताना चांगली खेळी केली होती. व त्यामुळे शुभमन गिलने पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अग्रवालसोबत सलामीवीर म्हणून उतरावे, असे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. सराव सामन्यात आपण स्वतः मैदानावर उपस्थित होतो. व त्यावेळेस शुभमन गिलने धमाकेदार खेळी केल्याने आपण प्रभावित झाल्याचे सुनील गावस्कर म्हणाले. आणि यामुळेच त्याने मयांक अग्रवालसह भारतीय संघाची सुरवात करावी, असे ते म्हणाले. 

युवीचे षटकार पुन्हा पाहायला मिळणार; T20 तून कॅमबॅक करण्याचे संकेत

सुनील गावस्कर यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे अ‍ॅलन बॉर्डर यांनी देखील शुभमन गिलच्या खेळीचे कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वातावरणात पृथ्वी शॉपेक्षा शुभमन गिलच्या फलंदाजीचे तंत्र अधिक योग्य असल्याचे मत अ‍ॅलन बॉर्डर यांनी व्यक्त केले आहे. तसेच येथिल परिस्थितीत शुभमन गिल हा अनुकूल खेळ करत असल्याचे अ‍ॅलन बॉर्डर यांनी म्हटले आहे. पृथ्वी शॉला सराव सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. याशिवाय, पृथ्वी शॉ नवीन चेंडूसमोर अडखळत असल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे अ‍ॅलन बॉर्डर म्हणाले. त्यामुळे भारतीय संघाचा निवडकर्ता म्हणून आपण पृथ्वी शॉ ऐवजी शुभमन गिलला अधिक पसंती दिली असती, असे अ‍ॅलन बॉर्डर म्हणाले.      
  


​ ​

संबंधित बातम्या