वृद्धिमन साहाऐवजी पंतला संधी द्या - सुनील गावसकर 

शैलेश नागवेकर
Tuesday, 15 December 2020

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आक्रमणाची गरज लागणार आहे. त्यामुळे यष्टिरक्षक फलंदाज म्हणून तांत्रिककृष्ट्या मजबूत असलेल्या वृद्धिमन साहाऐवजी आक्रमक शैलीच्या रिषभ पंतला संधी द्या, असा सल्ला माजी विक्रमवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी दिला आहे.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आक्रमणाची गरज लागणार आहे. त्यामुळे यष्टिरक्षक फलंदाज म्हणून तांत्रिककृष्ट्या मजबूत असलेल्या वृद्धिमन साहाऐवजी आक्रमक शैलीच्या रिषभ पंतला संधी द्या, असा सल्ला माजी विक्रमवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी दिला आहे.

AUSvsIND : विराटसाठी रणनीती तयार : लॅंगर 
 
प्रकाशझोतात झालेल्या सराव सामन्यात पंतने दुसऱ्या डावात 73 चेंडूत 103 धावांची वेगवान खेळी साकार केली होती. पंतच्या समावेशामुळे संघात लवचिकता येईल, असे गावसकर यांचे म्हणणे आहे. गावसकर पुढे म्हणतात, कोणाची निवड करायची हा संघ व्यवस्थापनासमोर प्रश्‍न असेलच. कारण पंत चारच कसोटी सामने खेळला आहे आणि तेही चार वर्षांपूर्वी त्याने शतकही केलेले आहे. तसेच यष्टींच्या मागे त्याची असलेली बडबड ऑस्ट्रेलियन फलंदाजांना विचलीतही करणारी ठरत असते. चार दिवसांपूर्वीच ज्याने शतक केले आहे. त्याची निवड करायला हवी. 

AUSvsIND: कोहलीने शतक केल्यास नावावर होऊ शकतो रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड  

ऑस्ट्रेलियात यष्टिरक्षण करणे तेवढे आव्हानात्मक नसते. चेंडू कमी-अधिक प्रमाणात उडत असतो किंवा फिरक घेत असतो. तेव्हा तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला यष्टिरक्षक आवश्‍यक असतो. परंतु येथे वेगवान गोलंदाजांसाठी बऱ्यापैकी अंतरावर यष्टिरक्षक उभा असतो. चेंडू पकडण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ असतो, असे गावसकर यांचे म्हणणे आहे. 

शॉऐवजी गिलला खेळवा 
सलामीसाठी मयांक अगरवालबरोबर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिलला खेळवा, असाही सल्ला गावसकर यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलेन बॉर्डर यांनी दिला आहे. गावसकर आणि बॉर्डर यांच्या नावानेच भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका खेळली जाते. भारताची सलामी संदिग्ध असल्याचे जाणवत असल्याचेही गावसकर म्हणाले. दोन्ही सराव सामन्यात शॉपेक्षा (0,19, 40, 3) गिलने (0, 29, 43, 65) सरस कामगिरी केलेली आहे. तसेच गिलच्या फलंजाजीवर बॉर्डर प्रभावीत झालेले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या