DRS मुद्दयावर सुनील गावस्करांचा देखील स्ट्रेट ड्राईव्ह   

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फलंदाज स्टीव्ह स्मिथ ज्याप्रकारे बाद झाला त्याच्यावर आता क्रिकेट वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फलंदाज स्टीव्ह स्मिथ ज्याप्रकारे बाद झाला त्याच्यावर आता क्रिकेट वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) तयार केलेल्या रिव्ह्यू सिस्टिमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्टीव्ह स्मिथला ज्या पद्धतीने बाद दिले गेले त्यावरून, रिव्ह्यू सिस्टिमच्या अंपायर कॉलवर पुनर्विचार करण्याचा सल्ला सुनील गावस्कर यांनी दिला आहे. 

'अंपायर्स कॉल'वर सचिन तेंडुलकर नाखूश!

भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी याबाबत बोलताना, स्टीव्ह स्मिथ ज्याप्रकारे बाद झाला त्यावरून बॉल स्टंपच्या किनाऱ्याला लागल्यानंतर देखील बॉलचा वेग जास्त असल्यामुळे अशावेळी बेल्स खाली पडतात. तसेच गोलंदाजाकडून लेग बिफोरची अपील करण्यात येते आणि बॉल स्टंपच्या वरील भागास लागल्यानंतर देखील बेल्स खाली पडतात, असे सांगितले. 

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ मेलबर्न कसोटीच्या तिसर्‍या दिवशी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्मिथ लेग साईडला खेळण्याच्या प्रयत्नात असताना, बॉल स्टंपच्या वरच्या टोकाला लागला. यावेळेस बेल्स पडल्यानंतर देखील थर्ड अंपायरने यावेळी रिव्ह्यू घेतल्याचे पाहायला मिळाले. बॉलने स्टंपच्या वरच्या टोकाला स्पर्श केला होता. आणि त्यामुळे बेल्स खाली पडल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र यावेळी बॉल स्टंपला न लागता फलंदाजाच्या पॅड लागला असता तर, पायचीतची अपील करता आली असती, असे सुनील गावस्कर यांनी नमूद केले. 

तसेच असे पायचितची अपील करण्यात आल्यानंतर देखील मैदावरील अंपायरने बॉल स्टंपच्या वरून जात असल्याचे समजून नॉट आऊट दिले असते. व रिव्ह्यू घेतल्यानंतरही थर्ड अंपायरकडून नॉट आऊटच देण्यात आले असते. कारण हा नियमानुसार अंपायरचा कॉल असल्याचे सुनील गावस्कर म्हणाले. आणि याच मुद्द्यावर जोर देताना, बॉल स्टंपला लागल्यानंतर सुद्धा अंपायरचा कॉल म्हणून नॉट आऊट दिले जाणे चुकीचे असल्याचे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक वेळेस याप्रकारे फलंदाज बाद झाल्याचा निर्णय दिल्यास सामना खूपच लहान होण्याची शक्यता असल्याचे देखील सुनील गावस्कर पुढे म्हणाले. 

ICC Decade Awards: टी-20- टेस्ट सोडलं तर सर्व पुरस्कारावर 'विराट'ची...

सुनील गावस्कर यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने देखील रिव्ह्यू सिस्टिमवर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सचिन तेंडुलकरने ट्विट करत, खेळाडू मैदानावरील अंपायर यांनी दिलेल्या निर्णयावर नाखूष असल्यामुळेच ते रिव्ह्यू घेतात. त्यामुळे डीआरएस संदर्भात आयसीसीने पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे मत सचिनने म्हटले आहे. याशिवाय त्याने खासकरून अंपायर कॉलचा पुनर्विचार होणे गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे.              

   


​ ​

संबंधित बातम्या