अजिंक्य म्हणतोय, अश्रूंची किंमत गोड! शास्त्रींनी मराठीत पुजाराला दिली 'बॅटल मॅन'ची उपमा (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी मराठी चाहत्यांसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची मराठीत मुलाखत घेतली.

कार्यवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात 'विराट' कामगिरी करुन दाखवली. भारतीय संघातील सर्वच शिलेदारांनी आपापली जबाबदारी लिलया पेलली. आजच्या अश्रींची किंमत एकदमच गोड होती. अजूनही विश्वास बसत नाही की काय झाल. सर्वांनीच चांगली कामगिरी केली, असे अजिंक्य रहाणेनं म्हटलं आहे.

त्याने खासकरून पदार्पणात दमदार कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंचे कौतुक केले. मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी यांनी जिद्दीच्या जोरावर चांगली कामगिरी करता येते, हे दाखवून दिले, असे अजिंक्यने म्हटले आहे. चांगल्या कामगिरीसाठी सर्वाधिक विकेट नावावर असणे गरजेचे नाही तर क्षमता असणे गरजेचे आहे, यावर भर देत त्याने पदार्पणात दमदार कामगिरी करुन दाखवलेल्या युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला. 

क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी मराठी चाहत्यांसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची मराठीत मुलाखत घेतली. सुनंदन लेले यांनी रवि शास्त्री यांना पुजाराच्या फलंदाजीवर प्रश्न विचारला होता. यावर पुजाराचा पुजी असा उल्लेख करत शास्त्रींना त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. पुजी आमचा 'बॅटल मॅन' आहे, असा ते म्हणाले.  

सावधान इंडिया! आनंदानं हुरळून जाऊ नका; इंग्लंडच्या दिग्गजाचा इशारा

अजिंक्य रहाणेनं देखील पुजाराच्या संयमी खेळीचं तोंडभरून कौतुक केले. एका बाजूने पुजारा मैदानात विकेट टिकवून होता. त्यामुळे पंतला फटकेबाजीसाठी राण मोकळे झाले. पुजारा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टनने संयम दाखवला आणि पंतने गेम प्लॅन यशस्वी केला, असे अंजिक्य म्हणाला. सुनंदन लेले यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन मराठी क्रिकेट चहात्यांसाठी खास मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या