AUSvsIND Pink Test : मास्टर ब्लास्टर सचिनकडून मॅकग्रा फाउंडेशनला खास गिफ्ट

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना पिंक टेस्ट असणार आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ऍडिलेड येथे झालेल्या पहिल्या डे नाईट सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मेलबर्न मध्ये झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियन संघावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुढील सामना गुरुवार पासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना पिंक टेस्ट असणार आहे. 

सिडनीचे एमसीजी मैदान हे पिंक टेस्ट म्हणून ओळखले जाते. या सामन्याच्या वेळेस मैदानावरील प्रेक्षकांपासून ते सर्वकाही पिंक करण्यात येते. मैदानावरील स्टंप, खेळाडूंची कॅप, बॅटची ग्रीप, विकेटकिपरच्या हातातील ग्लोव्हस हे देखील पिंक रंगाचे असतात. या सामन्यातून मिळणार निधी मॅकग्रा फॉउंडेशनसाठी देण्यात येतो. मॅकग्रा फॉउंडेशन ही एक चॅरिटी संस्था आहे. आणि याची स्थापना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने केली आहे. ब्रेस्ट कॅन्सर पीडितांना मदत करण्यासाठी ग्लेन मॅकग्राने या संस्थेची सुरवात केली होती. 

AUSvsIND : हिटमॅनच करणार डावाची सुरवात; भारतीय कर्णधारानं सांगितला प्लॅन 

पिंक टेस्टची सुरवात 2009 पासून करण्यात आली होती. 2009 मध्ये सर्वात प्रथम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पिंक टेस्ट सामना खेळवण्यात आला होता. तर मागच्या वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पिंक टेस्ट झाली होती. व या सामन्यातून 1.2 मिलियनहून अधिक रक्कम जमा करण्यात आली होती. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पिंक टेस्ट असणार आहे. 

याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या पिंक टेस्ट सामन्यापूर्वी आपली दहा क्रमांकाची कसोटी जर्सी मॅकग्रा फॉउंडेशनला दिली आहे. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावरील ट्विटरवर आपली जर्सी ग्लेन मॅकग्राकडे देत असल्याचा फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोत देखील सचिन आणि मॅकग्राने पिंक शर्ट घातल्याचे दिसत आहे.          


​ ​

संबंधित बातम्या