AUS vs IND : कमबॅक करण्यासाठी भारतीय संघात दिसू शकते बदलाचे वारे 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅडिलेड येथे झालेल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅडिलेड येथे झालेल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या 36 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे भारतीय संघावर चहुबाजुंनी टीका करण्यात येत आहे. तर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

''शमीच्या दुखापतीनंतर ईशांतच्या फिटनेससाठी BCCI ने रिव्ह्वू  घ्यावा...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा मेलबर्न येथील कसोटी सामना बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून खेळवण्यात येईल. शिवाय पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी भारतात परतणार आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. आणि अशा परिस्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल होणे जवळपास निश्चित आहे. कोहलीनंतर भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे. तसेच कोहलीच्या जागी केएल राहुलचा संघात समावेश करण्यात येऊ शकतो. त्याच्यानंतर वेगवान गोलंदाज शमी बाहेर पडल्यामुळे मोहम्मद सिराजचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होऊ शकते. 

विराट कोहली आणि मोहम्मद शमीच्या नंतर मागील काही दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉला दुसऱ्या कसोटी सामन्यात वगळण्यात येऊ शकते. त्यामुळे भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीत बदल होऊ शकतो. पृथ्वी शॉच्या जागी शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. आणि  शुभमन गिल व मयांक अग्रवाल डावाची सुरवात करू शकतात. त्याशिवाय वृद्धिमान साहा ऐवजी रिषभ पंतला संधी देण्यात येऊ शकते. कारण रिषभ पंतने सराव सामन्यात दमदार खेळी करत शतक झळकावले होते. 

AUS vs IND : टीम इंडियाला मोठा धक्का; फॅक्चरमुळं शमी झाला आउट!

दरम्यान, चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या डे नाईट सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत 1 - 0 ने आघाडीवर आहे. तर फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झालेला हिटमॅन रोहित शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्यातून मैदानात उतरणार आहे.    


​ ​

संबंधित बातम्या