AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. तर शेवटचा एकदिवसीय सामना 2 तारखेला होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका आतापर्यंत एकतर्फी राहिली आहे. दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात डोंगराएवढी धावसंख्या उभारून भारतीय संघाला रोखण्यात यश मिळवले. व मालिका आपल्या खिशात घातली. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने स्फोटक खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि चाहते ग्लेन मॅक्सवेलवर चांगलेच खुश आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या एका फटक्यावर बंदी घालणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. 

वन-डेतील वर्चस्व कसोटीतही ठेवण्याचा ऑस्ट्रेलियास विश्‍वास

ग्लेन मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी  ग्लेन मॅक्सवेलची स्तुती केली आहे. ग्लेन मॅक्सवेलने दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी करताना नावाला साजेसा खेळ करत धावा केल्याचे इयान चॅपल यांनी म्हटले आहे. मात्र ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजी करताना खेळलेल्या एका फटक्यावर त्यांनी नाखूष असल्याचे सांगितले. मॅक्सवेलने सामन्यात स्विच हिट मारत चांगल्याच धावा केल्या. या प्रकारेच त्याने सामन्यात एक षटकार देखील लगावला. त्यामुळे मॅक्सवेलच्या या फटक्यावर चॅपल यांनी नाराजी व्यक्त करत हा शॉट म्हणजे गोलंदाजांवर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या शॉटवर आयसीसीने बंदी घातली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

भारताविरुद्ध फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ज्यामध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ यांनी वेगवान फलंदाजी केल्याचा चांगलाच फायदा झाल्याचे झाल्याचे  इयान चॅपल यांनी म्हटले आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंनी अत्यंत चाणाक्षपणे फलंदाजी करताना  स्विच हिटचा उपयोग केला. व त्यांचे हे कौशल्य नक्कीच चांगले आहे. मात्र हे योग्य नसल्याचे चॅपल यांनी म्हटले आहे. शिवाय गोलंदाजांना गोलंदाजी करताना कोणत्या साईडने गोलंदाजी करणार आहे ते सांगावे लागते. परंतु फलंदाजांना अशा प्रकारचे कोणतेही बंधन नसल्याचे चॅपल यांनी सांगितले. व त्यामुळे फलंदाज चेंडू येण्यापूर्वी एका साईडने फलंदाजी करताना अचानक बाजू बदलून दुसऱ्या साईडने फलंदाजी करू लागल्यास हा गोलंदाजांवर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. 

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाला धक्का; तिसऱ्या वन-डे व टी-ट्वेन्टीमधून हुकमी एक्का...

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आणि या परभवाबरोबरच भारताला मालिका देखील गमावण्याची नामुष्की ओढवली. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचा धावफलक अधिक वेगाने धावा करत चालूच ठेवला होता.   मॅक्सवेलने 29 चेंडूत 63 धावा केल्या. तर पहिल्या सामन्यात त्याने 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या होत्या.                 


​ ​

संबंधित बातम्या