विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले 

संजय घारपुरे
Thursday, 3 December 2020

भारतीय फलंदाजांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत काही उणिवा दिसल्या असतील तर त्या लवकरच दूर होण्याची शक्‍यता आहे.

सिडनी : भारतीय फलंदाजांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत काही उणिवा दिसल्या असतील तर त्या लवकरच दूर होण्याची शक्‍यता आहे. विराट तसेच अन्य भारतीय फलंदाजांना कौशल्य सुधारण्यासाठी साह्य करणाऱ्या डी राघवेंद्र यांचे ऑस्ट्रेलियातील विलगीकरण अखेर संपले आहे. 

AUSvsIND : मालिका विजयानंतर देखील ब्रेट लीने व्यक्त केली नाराजी  

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी एकदिवसीय लढत जिंकल्यावर काही वेळातच संघ व्यवस्थापनास रघू सिडनीतील ट्‌वेंटी 20 लढतीपासून संघासोबत येणार असल्याचे समजले. रघू 9 नोव्हेंबरला भारतातून ऑस्ट्रेलियात आले होते. ऑक्‍टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे ते संघासोबत दुबईहून आले नव्हते. त्यानंतरही भारतीय संघाच्या सरावात ते एकदिवसीय मालिकेपूर्वी सहभागी होऊ शकतील असा कयास होता, पण विलगीकरणात असताना त्यांच्याबाबतचा एक चुकीचा कोरोना अहवाल आला आणि त्यांचे विलगीकरण दहा दिवसांनी वाढले, पण अखेर गुरुवारी रात्री त्यांचे विलगीकरण संपल्याचे सांगण्यात आले. 

AUSvsIND : T20 मालिकेत भारत ठरणार वरचढ ?

रघू हे थ्रोडाऊन एक्‍सपर्ट आहेत. त्यांच्या थ्रोडाऊनसमोर फलंदाजी केल्यामुळे भारतीयांच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यात सुधारणा झाली, असे कोहली आणि मार्गदर्शक रवी शास्त्री यांचे मत आहे. अनेक क्रिकेट संघ वेगवान गोलंदाजीच्या सरावासाठी मशीनचा वापर करतात, तर भारतीय संघाने रघूची निवड केली आहे. ते ताशी दीडशे किमी वेगाने चेंडू फेकतात. ते 2013 पासून संघासोबत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या