भारतीय संघातील नवख्या गोलंदाजाची सेहवागने केली प्रशंसा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघावर 13 धावांनी विजय मिळवला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघावर 13 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघावर एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीपची वेळ टाळता आली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी केलेल्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर 302 धावा केल्या होत्या. व त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकात सर्वबाद 289 धावांपर्यंतच मजल मारू शकला. जसप्रित बुमराह आणि टी नटराजन या दोघांनीही या सामन्यात प्रत्येकी दोन बळी मिळवले. व कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी एक-एक विकेट्स घेतली. तर, भारताकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

''आजपर्यंत अशा अफलातून गोलंदाजांचा सामना केला नव्हता''  

पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर अक्षरशः हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर, नवदीप सैनीच्या जागी टी नटराजन आणि चहलऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आले होते. व या सामन्यात टी नटराजनने फुलफॉर्म मध्ये असलेल्या फिंचला बाद करून भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले होते. तसेच त्यानंतर टी नटराजनने अ‍ॅष्टनची विकेट घेतली होती. त्यामुळे नटराजनने केलेल्या कामगिरीवर माजी खेळाडूंनी कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने वेगवान गोलंदाज टी नटराजनला भारतीय संघात संधी दिल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.      

सर्वात प्रथम टी नटराजनची प्रतिभा ओळखून त्याला इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत संधी दिल्याची कबुली भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने दिली आहे. तसेच किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठी टी नटराजनचा फक्त एक व्हिडीओ बघूनच त्याची निवड करण्यात आली असल्याचे त्याने सांगितले. मात्र यावेळी अनेक जणांनी फक्त तमिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळलेल्या या खेळाडूला मोठी रक्कम देऊन खरेदी केल्याबद्दल टीका केली होती. परंतु पैशासमोर टॅलेंट आपल्याला दिसल्याचे सेहवागने सांगितले. याव्यतिरिक्त त्यावेळेस पंजाब संघात असलेल्या काही खेळाडूंनी नटराजन हा चांगल्या गोलंदाजीसोबतच सलग आणि अचूक यॉर्कर टाकण्यात माहीर असल्याचे सांगितले होते. व त्यामुळे आपण त्याला संघात घेण्याचा निर्णय घेतल्याचे सेहवाग म्हणाला. 

हार्दिक पांड्याबाबत संजय मांजरेकरांनी घेतला यूटर्न   

याशिवाय पंजाबच्या संघात डेथ ओव्हर टाकण्यासाठी कोणताच गोलंदाज नव्हता. म्हणून ती नटराजनला घेण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने नटराजनला दुखापत होऊन त्याला फार सामन्यात खेळता आले नाही. मात्र त्याने जेवढे सामने खेळले तितकेच सामने पंजाब संघाने जिंकल्याचे सेहवागने सांगितले. पण त्यानंतर आता नटराजनला भारतीय संघात स्थान मिळाल्यामुळे आपल्या सर्वात जास्त आनंद झाल्याचे सेहवाग म्हणाला.      


​ ​

संबंधित बातम्या