AUSvsIND: पराभव पत्कराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला आयसीसीचा दे धक्का  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 1 - 1 ने बरोबरी साधली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने सुरवातीपासूनच आपले वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले. प्रभारी कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेच्या धमाकेदार खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवता आला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभवासोबतच अजून एक मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. 

ICC World Test Championship:टीम इंडियाची सुधारणा; पराभूत होऊनही ऑस्ट्रेलिया...

भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला सामन्यात हळू गोलंदाजी करण्याचा फटका बसला आहे. हळू गोलंदाजी केल्याबद्दल आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघावर कारवाई करत यासाठी सामना शुल्काच्या 40 टक्के दंड आकारला आहे. त्याशिवाय या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये  प्रथम स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे चार गुण वजा करण्यात आले आहेत. मात्र आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबल मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वाधिक 77 टक्के विजय मिळवले असल्याने कांगारूंचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. तर टीम इंडियाने 72 टक्के विजय मिळवलेले आहेत. आणि भारतीय संघ आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. आणि त्यामुळे न्यूझीलंडचा संघ या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पुन्हा मायदेशी परतला. त्यामुळे भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात 195 धावांवर रोखले होते. यानंतर अजिंक्य रहाणेने केलेल्या शतकीय खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 326 धावा केल्या होत्या. 

AusvsInd : पिंक बॉल विसरा; अजिंक्यच्या शिलेदारांनी कांगारुंना दिला 'रेड...

त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्या डावात 200 धावा करता आल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे टार्गेट भारतीय संघाने सहजरित्या पार करत सामना चौथ्या दिवशीच आपल्या खिशात घातला. दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरवात खराब झाल्याचे पाहायला मिळाले. सलामीवीर मयांक अग्रवालला 5 धावांवर असताना मिचेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा देखील पॅट कमिन्सचा शिकार ठरला. मात्र शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांनी पुन्हा एकदा भागीदारी रचत भारतीय संघाला आठ विकेट्सने विजय मिळवून दिला.  


​ ​

संबंधित बातम्या