AUSvsIND T20 : संजू सॅमसनने स्मिथचा घेतला भन्नाट झेल 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून तीन टी20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून तीन टी20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे.  तीन टी20 सामन्यांपैकी आज कॅनबेराच्या मनुका ओव्हल मैदानावर पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाने 20 षटकांत सात गडी गमावत 161 धावा केल्या आहेत. आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजयासाठी 162 धावा कराव्या लागणार आहेत.    

भर मैदानात प्रपोज करणाऱ्या 'दीपेन'ने सांगितली लव्ह स्टोरी 

भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरवात चांगली झाली असून, त्यांची पहिली विकेट 56 धावांवर पडली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिंचला यूजवेंद्र चहलने 35 धावांवर पांड्या करवी झेलबाद केले. त्यानंतर अवघ्या 12 धावांवर स्मिथला चहलने माघारी धाडले. एकदिवसीय सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथचा अफलातून झेल संजू सॅमसनने घेतला. 

स्टीव्ह स्मिथच्या नंतर ग्लेन मॅक्सवेलला नटराजनने अवघ्या दोन धावांवर बाद केले. त्यानंतर हेनरिक्स क्रिझवर पाय रोवत असतानाच त्याला दीपक चाहरने पायचीत केले. हेनरिक्सने 20 चेंडूत 30 धावा केल्या. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या संघाला 11 चेंडूत 35 धावा हव्या आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या