हार्दिक पांड्याबाबत संजय मांजरेकरांनी घेतला यूटर्न   

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

ऑस्ट्रेलिया सोबतच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

ऑस्ट्रेलिया सोबतच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तर शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. त्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली आहे. मात्र भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केले आणि संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली. हार्दिक पांड्याने भारतासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी येत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. 

AUSvsIND : भारताच्या ट्‌वेंटी 20 लढतीस हाऊसफुल उपस्थिती? 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात हार्दिकने फलंदाजी करताना नाबाद 92 धावा फटकावल्या आणि प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब देखील जिंकला. हा सामना भारताने 13 धावांनी जिंकला. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या खेळीचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील हार्दिक पांड्याच्या ऑस्ट्रेलियासोबतच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरीवर कौतुक केले आहे. यानंतर आता भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक महेश मांजरेकर यांनी देखील हार्दिक पांड्याची स्तुती करत युटर्न घेतला आहे.      

''आजपर्यंत अशा अफलातून गोलंदाजांचा सामना केला नव्हता''  

हार्दिक एकदिवसीय सामन्यात चांगला फलंदाज म्हणून खेळू शकेल की नाही याबद्दल शंका होती. परंतु त्याने आपल्याला चुकीचे सिद्ध केल्याचे संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या एक फलंदाज म्हणून खेळू शकत नाही आणि त्यामुळे पांड्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये मनीष पांडेला खेळवण्याची गरज असल्याचे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले होते. शिवाय इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील पांड्याच्या कामगिरीचा दाखला देत, हार्दिक हा टी-20 प्रकारातील उत्तम फलंदाज असल्याचे मांजरेकर यांनी म्हटले होते. तर एकदिवसीय क्रिकेटचा प्रकार हा वेगळा असल्यामुळे तो या फॉरमॅट मध्ये बसत नसल्याचे संजय मांजरेकर यांनी यापूर्वी सांगितले होते. 

AUSvsIND : जाणून घ्या तिसऱ्या सामन्यातील टीम इंडियाच्या विजयाची 5 कारणे

मात्र आता हार्दिक पांड्याच्या रूपात टीम इंडियाला सहाव्या क्रमांकासाठी एक चांगला आणि तंत्रशुद्ध फलंदाज सापडला असल्याचे संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे. व हार्दिक पांड्याला यापुढे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्यात येऊ शकते, असे संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर, ऑस्ट्रेलियासोबतची हार्दिक पांड्याची खेळी आश्चर्यकारक होती. व ती टी-20 प्रकारातील नक्कीच नसल्याचे मांजरेकर यांनी म्हटले आहे. तसेच हार्दिक सहाव्या क्रमांकासाठी परिपूर्ण फलंदाज असणाऱ्यांच्या मताशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, हार्दिक पांड्याने तीन सामन्यात पहिल्या सामन्यात 90 धावांची तुफानी खेळी होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 92 धावा केल्या होत्या. याशिवाय दुसर्‍या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने एक विकेटही घेतली होती.               


​ ​

संबंधित बातम्या