''स्विंग होणाऱ्या चेंडूवर नांगी टाकणे ही भारतीय फलंदाजांची परंपराच''  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला आश्चर्यकारक पराभवास सामोरे जावे लागले.

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला आश्चर्यकारक पराभवास सामोरे जावे लागले. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ठीक-ठाक फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावात मात्र भारतीय संघ अक्षरशः कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर गुडघे टेकल्यामुळे भारताला सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच हार मानावी लागली. त्यामुळे भारतीय संघावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे. 

AUS vs IND : कमबॅक करण्यासाठी भारतीय संघात दिसू शकते बदलाचे वारे 

सामन्याच्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावात मात्र फलंदाजांनी नांगी टाकली. त्यानंतर भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी संघाच्या कामगिरीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आणि त्यासोबतच त्यांनी भारतीय फलंदाजांची कमतरता देखील सांगितली आहे. भारतीय संघाचे फलंदाज स्विंग गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकत नसल्याचे संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे. याशिवाय चेंडू हवेत फिरल्यामुळे भारतीय फलंदाज अस्वस्थ होतात. व सध्याच्या घडीला फलंदाजांमध्ये ही सगळ्यात मोठी कमतरता असल्याचे संजय मांजरेकर यांनी सांगितले आहे. 

याशिवाय, ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावातील फलंदाजांची कामगिरी दुर्लक्ष जरी केल्यास, भारतीय संघ मागील काही काळापासून मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरत असल्याचे संजय मांजरेकर यांनी पुढे सांगितले आहे. मागील कसोटी सामन्यात 165,191,242,124,244 धावा केल्या होत्या. आणि आता 36 धावांवर भारतीय संघ आटोपला. मागील तीन कसोटी सामन्यातील भारतीय संघाची ही धावसंख्या असून, या तीनही सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागल्याचे संजय मांजरेकर यांनी म्हटले. याव्यतिरिक्त या सर्व सामन्यांमध्ये चेंडू स्विंग होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे आताच्या परिस्थितीत संघातील फलंदाज स्विंग गोलंदाजीसमोर धडपडत आहेत. मात्र त्यांच्याकडून मागील कामगिरीकडे पाहता चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण तसे घडले नसल्याचे संजय मांजेरकर यांनी सांगितले. 

''शमीच्या दुखापतीनंतर ईशांतच्या फिटनेससाठी BCCI ने रिव्ह्वू  घ्यावा...

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 244 धावांवर बाद झाला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत 191 धावांवर रोखले. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त 36 धावांवर बाद झाला होता.   


​ ​

संबंधित बातम्या