अजिंक्य शांत स्वभावाचा, पण...; वाचा मास्टर ब्लास्टर काय म्हणाला  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 24 December 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डे नाईट सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील ऍडिलेडच्या ओव्हल मैदानावर झालेला हा  विराट कोहलीचा अंतिम सामना होता. कारण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी मायदेशी परतला आहे. आणि त्यामुळे आगामी तीन सामन्यांसाठी भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डे नाईट सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील ऍडिलेडच्या ओव्हल मैदानावर झालेला हा  विराट कोहलीचा अंतिम सामना होता. कारण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी मायदेशी परतला आहे. आणि त्यामुळे आगामी तीन सामन्यांसाठी भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाबद्दल बोलताना, तो शांत स्वभावाचा असल्याचे म्हटले आहे. 

''शॉ ऐवजी शुभमन गिलने डावाची सुरवात केल्यास त्याच्यावर टांगती तलवार...

अजिंक्य रहाणेने यापूर्वी 2017 मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाची कॅप्टन्सी करणार आहे. यावर आता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भाष्य करताना, अजिंक्य रहाणे हा शांत स्वभावाचा असल्याचे सांगितले आहे. आणि त्याच्या या स्वभावामुळे कमकुवतपणा रहाणेला कमकुवत समजणे चुकीचे असल्याचे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. तसेच अजिंक्य रहाणे देखील विराट कोहली प्रमाणेच आक्रमक असल्याचे सचिनने सांगितले. 

याशिवाय, अजिंक्य रहाणेने याअगोदर सुद्धा भारतीय संघाचे नेतृत्व केलेले असून, त्याच्या शांत स्वभावाचा अर्थ तो आक्रमक नाही असा बिलकुल होत नसल्याचे सचिनने सांगितले. व आक्रमता दाखवण्याचा प्रत्येकाचा वेगेवेगळा मार्ग असल्याचे सचिनने नमूद केले. याव्यतिरिक्त जर एखादा खेळाडू आक्रमता दाखवत नाही, म्हणजे तो आक्रमक नाही, असे अजिबातच होत नसल्याचे सचिनने अधोरेखित केले. आणि उदाहरणादाखल चेतेश्वर पुजारा देखील अजिंक्य रहाणे सारखाच शांत असल्याचे सचिन म्हणाला. चेतेश्वर पुजाराचा स्वभाव देखील शांत आहे. याचा अर्थ तो इतरांपेक्षा कमी नसल्याचे सचिनने म्हटले. आणि पुजाराची आक्रमकता, देहबोली खेळीत असल्याचे सचिनने सांगितले. 

AUSvsIND : मरगळ झटकून भारतीय संघाची सरावाला सुरुवात 

तसेच, कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेची रणनीती विराट कोहलीपेक्षा वेगळी असू शकते. मात्र विराट प्रमाणे अजिंक्य रहाणेचे लक्ष्य देखील सामना जिंकणे हेच राहणार असल्याचे सचिन म्हणाला. दरम्यान, कसोटीच्या दोन सामन्यांमध्ये रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळलेले आहे. आणि 2017 मध्ये धर्मशाळा येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया सोबतच्या एका सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता.   

         


​ ​

संबंधित बातम्या