AUSvsIND : कांगारूंनो सावधान; हिटमॅनचे इंजिन सुरु झाले आहे 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा बुधवारी टीम इंडियात सामील झाला. त्यानंतर रोहित शर्माने आज मैदानात उतरत सरावाला सुरवात केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा बुधवारी टीम इंडियात सामील झाला. त्यानंतर रोहित शर्माने आज मैदानात उतरत सरावाला सुरवात केली आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा सिडनीत दाखल झाला होता. व त्यानंतर त्याने चौदा दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर काल मेलबर्न येथे भारतीय संघात सामील झाला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. 

आगामी कसोटीसाठी गावस्करांनी सुचवले बदल; वाचा कोण होणार आऊट  

रोहित शर्माने गुरुवारी टीम इंडियामध्ये सामील झाल्यानंतर मैदानावर सराव केला. यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्माचा सराव करतानाचा फोटो सोशल मीडियाच्या ट्विटरवर शेअर केला आहे. आणि या फोटोसोबतच बीसीसीआयने इंजिन नुकतेच सुरू झाले असल्याची कमेंट केली लिहिली आहे. याशिवाय हिटमॅन टीम इंडियात सामील झाल्यानंतर आगामी सामन्यात तो प्लेयिंग इलेव्हन मध्ये दिसण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने रोहित शर्मा संघात आल्याने टीम इंडियाचे मनोबल उंचावणार असल्याचे दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर म्हटले होते. 

ICC Test Ranking : पॅटर्निटी लिव्हवरुन परतलेल्या केन विल्यमसला मिळाली गूड...

काही दिवसांपूर्वीच बंगळुरु येथे असलेल्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीत (एनसीए) रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली होती. व त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला होता. तर इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सुरवातीला काही सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. व त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले होते. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यात देखील तो अनुपस्थित राहिला होता.     

दरम्यान,  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान सिडनीत खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.    


​ ​

संबंधित बातम्या