उपकर्णधार रोहित शर्मा आगामी सामन्यासाठी सज्ज; केला नेटमध्ये कसून सराव 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 1 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरवारपासून सिडनीच्या एमसीजी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरवारपासून सिडनीच्या एमसीजी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. त्यानंतर आता हिटमॅन रोहित शर्माला आगामी सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतला आहे. आणि त्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. तर दुसऱ्या मेलबर्न येथे झालेल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराकडे उपकर्णधारपद सुपूर्द करण्यात आले होते. 

AUSvsIND : सिडनी कसोटीवर पुन्हा कोरोनाचे संकट 

सिडनी कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिसर्‍या कसोटीसाठी संघाची घोषणा केली. आणि रोहितकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा सिडनीत दाखल झाला होता. व त्याने चौदा दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर मेलबर्न येथे भारतीय संघात सामील झाला होता. टीम इंडियात झाल्यानंतर रोहित शर्माने मैदानावर कसून सरावास सुरवात केली आहे. बीसीसीआयने रोहित शर्माचा सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या ट्विटरवर शेअर केला आहे. आणि या व्हिडिओसोबतच बीसीसीआयने अखेर प्रतीक्षा संपली आहे असा, कॅप्शन देखील या पोस्ट मध्ये दिला आहे. 

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात बदल; वाचा कोणला मिळाली बढती!

बीसीसीआयने शेअर केलेल्या या पोस्ट मध्ये रोहित शर्मा नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असल्याचे दिसत आहे. तर यापूर्वी काल बीसीसीआयने रोहित शर्मा मैदानावर उतरून कॅच घेण्याची प्रॅक्टिस करत असल्याचा फोटो सोशल मीडियाच्या ट्विटरवर शेअर केला होता. हिटमॅन टीम इंडियात सामील झाल्यानंतर आगामी सामन्यात तो प्लेयिंग इलेव्हन मध्ये दिसण्याची शक्यता निश्चित झाली आहे. 

काही दिवसांपूर्वीच बंगळुरु येथे असलेल्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीत (एनसीए) रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली होती. व त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला होता. तर इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सुरवातीला काही सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. व त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले होते. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यात देखील तो अनुपस्थित राहिला होता.        


​ ​

संबंधित बातम्या