INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेत पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे.

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेत पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका येत्या 27 तारखेपासून सुरु होणार आहे. आणि त्यानंतर या दोन्ही संघात तीन टी20 सामने होणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिकेत दिसणार नाही, पण तो कसोटी मालिकेत भाग घेण्याची अपेक्षा आहे. तसेच रोहित शर्मा एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे आणि कसोटी मालिकेपूर्वी तो पूर्णपणे फिट होईल अशी अपेक्षा केली जात आहे. आणि त्यानंतरच तो तंदुरुस्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रवाना होईल.   

रोहित-विराट 'वाटणीवर'; कपिलपाजींचा 'कल्चर' स्ट्रोक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने एका मुलाखतीत  बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. या मुलाखतीत त्याने संघाच्या गरजेनुसार कोणत्याही ऑर्डरवर फलंदाजी करण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे. तसेच पहिल्या कसोटी सामन्यांनंतर विराट कोहली परतल्यावर सलामीवीर म्हणून कोणता खेळाडू मैदानात उतरेल हे सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलीयात असलेल्या खेळाडूंनी ठरवलेले असेल. आणि त्यामुळे आपण कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास सज्ज असल्याचे रोहितने म्हटले आहे. परंतू ऑस्ट्रेलीयात पोह्चल्यानंतरच याबाबत अधिक स्पष्ट होईल असे, रोहितने या मुलाखतीत सांगितले आहे. 

याव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियन खेळपट्टीबद्दल बोलताना रोहित शर्माने पर्थ सोडून इतर कोणत्याही ठिकाणी बॉल उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले नसल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलीयातील खेळपट्ट्या या बॉल उसळी घेण्यासाठीच ओळखल्या जातात. मात्र मागील दोन-तीन वर्षात आपल्याला पर्थ सोडून उर्वरित ठिकाणी असा कोणता अनुभव आला नसल्याचे त्याने सांगितले. तसेच सध्या फलंदाजी करताना कटशॉट किंवा पूल खेळण्यास अडचण जाणवत असल्याचे त्याने म्हटले आहे. 

मॅक्सवेल 10 कोटीची चिअरलीडर; सेहवागच्या बोलंदाजीवर ऑसी खेळाडूची संयमी फटकेबाजी

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 17 नोव्हेंबरपासून सुरू होईल. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिली कसोटी प्रकाशझोतात घेण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आग्रही आहे. त्यामुळे ही कसोटी ॲडलेडला न झाल्यास त्यासाठी ब्रिस्बेनचा पर्याय तयार ठेवण्यात आला आहे. दुसरी कसोटी मेलबर्नला असल्याने सलग दोन कसोटी मेलबर्नला खेळवण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया तयार नाही. त्याचबरोबर मेलबर्न असलेल्या व्हिक्‍टोरियातील लॉकडाऊन नुकताच उठवण्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे.     


​ ​

संबंधित बातम्या