AUSvsIND: हिटमॅन लवकरच मेलबर्नला जाणार; पण तिसऱ्या कसोटीवर कोरोनाचे सावट  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा येत्या बुधवारी दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर भारतीय संघात सामील होणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा येत्या बुधवारी दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर भारतीय संघात सामील होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळवण्यात येत आहे. आणि या सामन्याच्या शेवटच्या दिवशी रोहित शर्मा मेलबर्न येथे भारतीय संघात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सिडनीत खेळवण्यात येणारा तिसरा कसोटी सामना मेलबर्न मधेच खेळवण्यात येण्याची शक्यता बळावली आहे.  

DRS मुद्दयावर सुनील गावस्करांचा देखील स्ट्रेट ड्राईव्ह   

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात 'हिटमॅन' रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर रोहित शर्मा सिडनी येथे क्वारंटाईन होता. त्यानंतर आता तो सिडनीतून मेलबर्न येथे जाणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच बंगळुरु येथे असलेल्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीत (एनसीए) रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली होती. व त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला होता. तर इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सुरवातीला काही सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. व त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले होते. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यात देखील तो अनुपस्थित राहिला होता. 

'अंपायर्स कॉल'वर सचिन तेंडुलकर नाखूश!

सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर पुढील तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळवण्याचे नियोजन आहे. मात्र या सामन्यावर कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचे (एमसीजी) मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी संदर्भात बोलताना, सध्यातरी परिस्थिती 50-50 झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच सिडनी येथे तिसरा कसोटी सामना व्हावा अशी इच्छा असली तरी परिस्थिती बिकट बनली असल्याचे त्यांनी सांगितले कालच सांगितले होते. तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या शेवटच्याच दिवशी पुढील तिसऱ्या सामन्याबाबत निर्णय निश्चित होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान सिडनीत खेळवण्यात येणार आहे. तर ऑस्ट्रेलियात काही भागांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकारणांमुळे स्थानिक प्रशासनाने हाय अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडनीच्या उत्तर भागात कोरोनाचा प्रभाव वाढू लागलेला आहे. अशातच तिसऱ्या सामन्यानंतर न्यू साऊथ वेल्स प्रशासनाने खेळाडूंना ब्रिस्बेन मध्ये येण्यास परवानगी नाकारली तर चौथ्या कसोटी सामन्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळवण्याची तयारी करण्यात येऊ शकते. अथवा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवण्यात येणाऱ्या मेलबर्न येथेच तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही संघांना सिडनीला न जाता शेवटच्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला जाता येईल.   


​ ​

संबंधित बातम्या