AUSvsIND 2nd Test 3rd Day : रिषभ पंत आणि वेड यांच्यात रंगला कलगीतुरा  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर पकड मिळवली असल्याचे चित्र आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर पकड मिळवली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 6 विकेट्स गमावत 133 धावा केल्या आहेत. व दोन धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाच्या संघाने मिळवली आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत. 

AUSvsIND: हिटमॅन लवकरच मेलबर्नला जाणार; पण तिसऱ्या कसोटीवर कोरोनाचे सावट  

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 326 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून सर्वाधीक धावा कर्णधार अजिंक्य रहाणेने केल्या. तो 122 धावांवर बाद झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताने ऑस्ट्रेलियावर 131 धावांची आघाडी मिळविली. भारतीय संघाच्या फलंदाजीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र यावेळेस ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेड आणि भारतीय संघाचा विकेटकिपर रिषभ पंत यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन डावाच्या 25 व्या षटकात मॅथ्यू वेडने बुमराहच्या बॉलचा डिफेन्स केला. यानंतर पंत विकेटच्या मागून सतत काही बडबडताना दिसला. आणि त्याच्यानंतर मॅथ्यू वेडने रिषभ पंत कडे रागाने बघितल्याचे पाहायला मिळाले. मात्र यांच्यानंतर मॅथ्यू वेडने रिषभ पंतच्या वजनासंबंधित भाष्य करत, तुझे वजन 25 किलो जास्त असल्याचे मॅथ्यू वेडने म्हटले. 

DRS मुद्दयावर सुनील गावस्करांचा देखील स्ट्रेट ड्राईव्ह   

मॅथ्यू वेडने फलंदाजी करताना रिषभ पंतसोबत केलेला संवाद स्टंप माईक मधून स्पष्टपणे ऐकू येत होता. यावेळेस मॅथ्यू वेडने रिषभ पंतला तुझे वजन 25 किलो जास्त असल्याचे म्हटले. त्याशिवाय आपले वजन 20, 25 किंवा 30 किलोपेक्षा अधिक असल्याचे मॅथ्यू वेड म्हणाला. त्याशिवाय मॅथ्यू वेडने रिषभ पंतला स्क्रीनवर देखील पाहण्यास सांगत, तू खूप फनी दिसत असल्याचे सांगितले. मॅथ्यू वेड इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मी तुला दाखवतो की तू स्क्रीन वर खूपच मजेशीर दिसतोस, असे देखील म्हटले. 

दरम्यान, दुसर्‍या डावात 137 बॉलचा सामना करत वेडने 40 धावा केल्या. रवींद्र जडेजाने त्याला पायचीत केले. सामना संपल्यानंतर मॅथ्यू वेडने रिषभ पंत संबंधित बोलताना, तो नेहमीच हसत असल्याचे सांगितले. तसेच हसण्यासारखे काय आहे हे माहित नाही पण, कदाचित रिषभ पंत आपल्या फलंदाजीवर हसत असावा, असे मॅथ्यू वेड म्हणाला.          


​ ​

संबंधित बातम्या