AUSvsIND: कोहलीने शतक केल्यास नावावर होऊ शकतो रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अ‍ॅडिलेड येथे गुरुवारी 17 तारखेपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे मालिकेचा पहिला सामना खूप महत्वाचा ठरणार आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा पहिल्या कसोटी सामन्यानंतर पुन्हा मायदेशी परतणार आहे. तसेच हा सामना डे नाईट असेल जो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रथम खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला मागे टाकत कोहलीला नवा विश्वविक्रम करण्याची संधी आहे. 

दशकातील टी-ट्वेन्टी संघात धोनी नाही; आकाश चोप्राने निवडला अजब कॅप्टन     

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा पहिला डे-नाईट कसोटी सामना महत्वपूर्ण असणार आहे. आणि या सामन्यानंतर कोहली पुढील तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसून, तो भारतात परतणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात चांगली खेळी करण्याची संधी विराट कोहलीला आहे. व या संधीचे सोने करत त्याने या सामन्यात शतकीय खेळी केल्यास त्याच्या नावावर नवा विक्रम रचला जाऊ शकतो. शिवाय या शतकाने तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला मागे टाकू शकतो. 

विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना आतापर्यंत 41 शतक लगावले आहेत. आणि आता अजून एक शतक कोहलीने झळकावल्यास तो याबाबतीत रिकी पॉन्टिंगच्या पुढे जाईल. कारण रिकी पॉन्टिंग देखील कर्णधार असताना 41 शतक केले होते. त्यामुळे आगामी पहिल्या कसोटी सामन्यात विराटने शतक केल्यास तो रिकी पॉन्टिंगच्या पुढे जाईल. तसेच 324 सामने खेळल्यानंतर रिकी पॉन्टिंगने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. तर विराट कोहली फक्त 188 व्या सामन्यात शतक करून हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. 

युवीचे षटकार पुन्हा पाहायला मिळणार; T20 तून कॅमबॅक करण्याचे संकेत

कर्णधार म्हणून विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात 21 शतके केली आहेत. तर कसोटीत त्याची 20 शतके आहेत. आणि पॉन्टिंगने एकदिवसीय सामन्यात 19 आणि कसोटीत 22 शतके ठोकली आहेत. कर्णधार म्हणून कोहलीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 5142 धावा केल्या आहेत. व यादरम्यान, त्याची सरासरी 61 राहिली असून, नाबाद 254 ही विराटची सर्वश्रेष्ठ धावसंख्या आहे.         


​ ​

संबंधित बातम्या