वा रे पठ्ठ्या; अर्धशतकी खेळी केलेल्या पुकोव्हस्कीचं पाँटिंगनं केलं कौतुक!

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

कांगारूंकडून कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण करत असलेल्या विल पुकोव्हस्की आणि लबूशेन यांनी सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावले. यावर ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिगने समाधान व्यक्त करतानाच विल पुकोव्हस्कीच्या खेळीचे कौतुक केले आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2 गडी गमावत 166 धावा केल्या आहेत. कांगारूंकडून कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण करत असलेल्या विल पुकोव्हस्की आणि लबूशेन यांनी सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावले. यावर ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिगने समाधान व्यक्त करतानाच विल पुकोव्हस्कीच्या खेळीचे कौतुक केले आहे. 

पंतने संधी गमावली अन् पदार्पण करणाऱ्या पुकोवस्कीनं त्याच सोनं केलं (VIDEO)

पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 62 धावांची खेळी करणाऱ्या विल पुकोव्हस्कीवर रिकी पॉन्टिग चांगलाच प्रभावित झाला आहे. आणि आगामी काळात विल पुकोव्हस्की दमदार फलंदाज म्हणून पुढे येणार असल्याचे मत रिकी पॉन्टिगने व्यक्त केले आहे. सोशल मीडियावरील ट्विटरवर रिकी पॉन्टिगने विल पुकोव्हस्कीच्या फलंदाजीने प्रभावित केल्याचे म्हटले आहे. मात्र यावेळेस त्याला काही जीवदान मिळाले. परंतु त्याचा फायदा उचलता आला नसल्याचे देखील रिकी पॉन्टिगने नमूद करत, त्याने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात आणि पहिल्या डावात केलेली खेळी चांगला संकेत देत असल्याचे म्हटले आहे. 

पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरवात खराब झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला अवघ्या पाच धावांवर चेतेश्वर पुजारा करवी झेलबाद केले. मात्र त्यानंतर सलामीवीर विल पुकोव्हस्की आणि लबूशेन यांनी डाव सावरला. या दोघांनीही दुसऱ्या विकेट साठी शतकीय भागीदारी रचली. पुकोव्हस्कीने अर्धशतकीय खेळी केल्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत असलेल्या नवदीप सैनीने पायचीत केले. पुकोव्हस्कीने 110 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. 

दरम्यान, विल पुकोव्हस्की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातूनच मैदानात उतरणार होता. मात्र सराव सामन्याच्या वेळेस पुकोव्हस्कीच्या डोक्याला चेंडू लागून तो दुखापतग्रस्त झाला होता. आणि त्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्याच्यापूर्वी विल पुकोव्हस्की तंदरुस्त झाल्यामुळे त्याला प्लेयिंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आले.          


​ ​

संबंधित बातम्या