टीम इंडियावरील निर्बंध शिथिल होणार नाहीत; चौथ्या कसोटी सामन्यावर अनिश्चिततेचे ढग

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या एमसीजी मैदानावर खेळवण्यात येत आहे. तर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या एमसीजी मैदानावर खेळवण्यात येत आहे. तर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीला या सामन्यावर अनिश्चिततेचे काळे ढग पसरले आहेत. आणि कदाचित हा सामना ब्रिस्बेन ऐवजी अन्य ठिकाणी किंवा रद्द होण्याची देखील चिन्हे दिसू लागली आहेत. कारण कोरोनाच्या संबंधित नियमांमध्ये क्वीन्सलँडच्या स्थानिक प्रशासनाने सूट देण्यास तयार नसल्याचे म्हटले आहे. 

चीते की चाल, बाज की नजर आणि जडेजाचा थ्रो...शंका नाही! (VIDEO)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) स्पर्धेपासून भारतीय संघातील खेळाडू जैवसुरक्षित वातावरणात आहेत. आणि त्यामुळे ब्रिस्बेन येथील नियोजित कसोटी सामन्याच्या वेळेस भारतीय संघ कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या कडक नियमांमध्ये वावरण्यास तयार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट आस्ट्रेलियाला कळवले आहे. अशातच आज क्वीन्सलँडच्या स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी दोन्ही संघांना ब्रिस्बेन मध्ये दाखल झाल्यानंतर क्वारंटाइनच्या कडक नियमांमध्ये राहावे लागणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.       

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील उत्तर भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाची प्रकरणे वाढू लागल्याचे समोर आले होते. आणि त्यामुळे सिडनीतून ब्रिस्बेन येथे दाखल झाल्यानंतर दोन्ही संघांना कोणत्याही परिस्थितीत क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याचे क्वीन्सलँडच्या प्रशासनाने म्हटले आहे. तसेच प्रशिक्षण आणि सरावासाठी म्हणून संघातील खेळाडूंना मैदानावर जाण्याची परवानगी देण्यात येईल. मात्र त्यानंतर या खेळाडूंना हॉटेल मधून बाहेर पडण्यास मनाई राहणार असल्याचे क्वीन्सलँडच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

याशिवाय, कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष असून, क्वीन्सलँड मधील नागरिकांसाठी आवश्यक ते सर्व बदल करण्यात येणार असल्याचे क्वीन्सलँडमधील स्वास्थ्य विभागाच्या प्रवक्त्याने आज नमूद केले आहे. तसेच मुख्य आरोग्य अधिका्यांनी 6 जानेवारी 2021 रोजी क्वीन्सलँड येथे चौथा कसोटी सामना आयोजित करण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोव्हीड-सेफ आणि क्वारंटाईन योजनेला मान्यता दिली असल्याचे या प्रवक्त्याने अधोरेखित केले. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या डे नाईट सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. आणि त्यानंतर आता तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. तर शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.     


​ ​

संबंधित बातम्या