AUSvsIND 3 T20: जाणून घ्या टीम इंडियाच्या तिसऱ्या टी-ट्वेन्टीतील पराभवाची कारणे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले असल्यामुळे तीन टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताने याअगोदरच आपल्या नावावर केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले असल्यामुळे तीन टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताने याअगोदरच आपल्या नावावर केली आहे. आज झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरऑस्ट्रेलियाच्या संघाने मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात पाच गडी गमावत 186 धावा केल्या होत्या. तर भारतीय संघ 20 षटकांत सात गडी गमावून 174 धावांपर्यंतच पोहचू शकला. 

AUSvsIND 3 T20: अर्धशतकाच्या खेळीसह मॅथ्यू वेडने केला नवा विक्रम  

1.भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर कांगारुंची सुरवात फारशी चांगली झाली नव्हती. भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पहिल्याच षटकात फुलफॉर्म मध्ये असलेल्या ऍरॉन फिंचला शून्य धावांवर माघारी धाडले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला देखील सुंदरने 24 धावांवर बाद करत भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ चांगल्याच दबावात आला होता.  

2.मात्र त्यानंतर मॅक्सवेल आणि वेड यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला सावरत भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केल्याचे पाहायला मिळाले. मॅथ्यू वेड आणि मॅक्सवेल यांनी मैदानावर पाय रोवत 90 धावांची भागीदारी रचली. वेडने सलग दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक केले. वेड 80 धावा करून बाद झाला. त्याला शार्दूल ठाकूरने बाद केले. याशिवाय, मॅक्सवेलने 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. मॅक्सवेलला टी नटराजनने आऊट केले. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना या दोन्ही खेळाडूंना रोखता आले नाही. आणि ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या वाढतच राहिली.    

3.मॅथ्यू वेड आणि मॅक्सवेल परतल्यानंतर शॉर्ट सात धावांवर धावबाद झाला. तर हेनरिक्स आणि डॅनियल सॅम हे दोघेही नाबाद राहिले. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकात पाच गडी गमावत 187 धावांचे लक्ष टीम इंडियासमोर ठेवले होते. 

4.ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताची सुरवात देखील खराब झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलला अवघ्या शून्य धावांवर मॅक्सवेलने स्टीव्ह स्मिथ करवी झेलबाद केले. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी भारताच्या डावाला सावरत 74 धावांची भागीदारी केली. मात्र शिखर धवनला 28 धावांवर मिचेल स्वीप्सनने बाद केले. धवननंतर संजू सॅमसन आजच्या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला देखील स्वीप्सनने माघारी पाठवले. 

5.यानंतर श्रेयस अय्यर देखील फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याला शून्यावर असताना स्वीप्सनने पायचीत केले. तर दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात धमाकेदार कामगिरी करणारा हार्दिक पांड्या देखील आज लवकर बाद झाला. हार्दिक पांड्याने कोहलीला साथ देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला ऍडम झम्पाने फिंचकडे झेलबाद केले. हार्दिकने 13 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारासह 20 धावा केल्या. यानंतर एका बाजूला भारताची बाजू सांभाळून धरलेला विराट कोहली टायच्या गोलंदाजीवर डॅनियल सॅमकडे झेल देऊन बसला. त्यामुळे भारताच्या विजयाच्या उरल्या-सुरल्या आशा देखील धूसर झाल्या. विराटने 61 चेंडूत तीन षटकार आणि चार चौकार यांच्या मदतीने 85 धावा केल्या. 

6.विराट कोहली बाद झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर सात धावांवर असताना त्याला एबॉटने आऊट केले. त्यानंतर शार्दूल ठाकूरने सात चेंडूत दोन षटकार लगावत 17 धावा केल्या. मात्र 20 षटक संपुष्टात आल्यामुळे भारतीय संघाला सात गडी गमावत 174 धावाच करता आल्या. व त्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय यामुळे संघाला 2016 ची पुनरावृत्ती करता आली नाही. 2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने ट्‌वेन्टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली होती. 

 

 

दरम्यान, तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका 17 डिसेंबर पासून खेळवण्यात येणार आहे.    

   


​ ​

संबंधित बातम्या