'बॉक्सिंग डे' सामना म्हणजे काय ? घ्या जाणून 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 25 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना उद्या मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना उद्या मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. हा सामना 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना असणार आहे. मात्र या कसोटी सामन्याला 'बॉक्सिंग डे' का म्हटले जाते हे तुम्हाला माहिती आहे का?  

AUSvsIND : बॉक्सिंग डे सामन्याच्यापूर्वी अजिंक्य रहाणेचे मोठे वक्तव्य

ऑस्ट्रेलिया सोबच्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेला हा पहिलाच डे नाईट सामना होता. त्यानंतर आता उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना देखील सर्वात महत्वपूर्ण असणार आहे. कारण दोन्ही संघातील ही कसोटी 'बॉक्सिंग डे' असणार आहे. 

जगभरात ख्रिसमस नंतरच्या दुसऱ्या दिवसाला 'बॉक्सिंग डे' म्हटले जाते. आणि सर्वजण या दिवशी ख्रिसमसला मिळालेले (बॉक्स मध्ये मिळालेले) गिफ्ट्स ओपन करून बघतात. याशिवाय अनेकजण आपल्याला मिळालेले काही गिफ्ट्स गरजू लोकांना देतात. त्यामुळे या दिवसाला 'बॉक्सिंग डे' दिवस म्हणून संबोधले जाते. तर ऑस्ट्रेलियात या दिवसाचा संबंध मागील 100 वर्षांहून जुना आहे. आणि मेलबर्नच्या एमसीजी ग्राउंडशी असलेले 'बॉक्सिंग डे'चे नाते 1980 पासून सुरू झाले आहे. 

''टीम इंडियाच्या विकेटकिपिंग साठी संगीत खुर्ची'' 

आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एमसीजीशी करार केला. व दरवर्षी 26 डिसेंबरला या ऐतिहासिक मैदानावर 'बॉक्सिंग डे' सामना खेळवला जातो. शिवाय, आता ऑस्ट्रेलियात नव्हे तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका येथे देखील बॉक्सिंग डे टेस्ट आयोजित केली जाते.    


​ ​

संबंधित बातम्या