AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या टी-ट्वेन्टी सामन्याच्या विजयाची कारणे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागल्यामुळे भारतीय संघाला मालिका गमवावी लागली होती.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागल्यामुळे भारतीय संघाला मालिका गमवावी लागली होती. मात्र त्यानंतर आज झालेल्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 ने आघाडी घेतली आहे. आज झालेल्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघाने 20 षटकांत सात गडी गमावत 161 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचा 1510 धावांपर्यंतच मजल मारू शकला.    

बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलची कमाल; वाचा नेमके काय घडले   

1. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिल्यानंतर संघाची सुरवात फारशी चांगली झाली नसल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन हा फक्त एक धाव करून माघारी परतला. त्याला मिचेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांची भागीदारी होत असतानाच कोहली स्विप्सनचा शिकार झाला. कोहलीला स्विप्सनने अवघ्या नऊ धावांवर माघारी धाडले. त्यापाठोपाठ संजू सॅमसनच्या रूपात भारताची तिसरी विकेट पडली. संजू सॅमसनने 15 चेंडूत 23 धावा केल्या. त्याला हेनरिक्सने स्विप्सन करवी झेलबाद केले. मात्र एका बाजूला केएल राहुलने भारतीय संघाची खिंड लढवली. 

2. त्यानंतर मनीष पांडेला अवघ्या दोन धावांवर ऍडम झम्पाने परत पाठवले. व याच्या पाठोपाठ केएल राहुल देखील हेनरिक्सचा शिकार झाला. केएल राहुलने पाच चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने 51 धावा केल्या. त्याच्यानंतर हार्दिक पांड्याला आजच्या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. तो 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार खेळी करणाऱ्या रवींद्र जडेजाने आजच्या सामन्यात देखील चांगली खेळी केल्याचे पाहायला मिळाले. त्याने 23 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघ सात गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा करू शकला. 

3. भारताने दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरवात दमदार झाली होती. सलामीवीर फिंच (35) आणि शॉर्ट (34) यांनी पहिल्या विकेट साठी 56 धावांची भागीदारी केली होती. यावेळी मनीष पांडेने फिंचचा तर विराट कोहलीने शॉर्टचा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. मात्र ही जोडी यूजवेंद्र चहलने फोडून भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने फिंचला 35 धावांवर पांड्या करवी झेलबाद केले. त्यानंतर अवघ्या 12 धावांवर स्मिथला देखील चहलने माघारी धाडले. 

4. स्टीव्ह स्मिथच्या नंतर ग्लेन मॅक्सवेलला नटराजनने अवघ्या दोन धावांवर बाद केले. त्यानंतर हेनरिक्स क्रिझवर पाय रोवत असतानाच त्याला दीपक चाहरने पायचीत केले. हेनरिक्सने 20 चेंडूत 30 धावा केल्या. हेनरिक्स नंतर टिकून राहिलेला सलामीवीर शॉर्टला नटराजनने पांड्या करवी झेलबाद केले. शिवाय वेड आणि स्टार्क देखील लगेच बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकांत सात गडी गमावत 150 धावाच करू शकला.  

5. टी नटराजनने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात लक्षणीय कामगिरी केली होती. त्याने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आजच्या टी 20 सामन्यात देखील त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत तीन बळी मिळवले. याशिवाय क्रिकेट मधील कन्कशन सबस्टिट्यूटमुळे प्लेयिंग इलेव्हन मध्ये नसलेल्या यूजवेंद्र चहलला आजच्या सामन्यात गोलंदाजी करता आली. फलंदाजी दरम्यान मिशेल स्टार्कच्या 18 व्या षटकात रविंद्र जडेजाला चेंडू लागल्यामुळे तो फिल्डिंग साठी मैदानात येऊ शकला नाही. यानंतर त्याच्या बदल्यात मैदानात आलेल्या यूजवेंद्र चहलने गोलंदाजी करत, चार षटकांत 25 धावा देऊन तीन बळी मिळवले. यात चहलने अ‍ॅरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड सारख्या फुलफॉर्म मध्ये असलेल्या फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवला. 

दरम्यान, यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-ट्वेन्टी सामना रविवारी सहा तारखेला सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.

  


​ ​

संबंधित बातम्या