AUSvsIND : फक्त एक विकेट दूर; सर जडेजाच्या नावावर होणार अनोखा विक्रम

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आतापर्यंत दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आतापर्यंत दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवींद्र जडेजाने फलंदाजीसह गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये देखील उत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिडनी कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजा हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अफलातून फिल्डिंग करत रवींद्र जडेजाने शतकी खेळी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला धावबाद केले. यासह त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना माघारी धाडले. व आता तो नव्या विक्रमाजवळ पोहचला आहे. 

तब्बल चौदा वर्षांनी दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर  

ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 338 धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने पहिल्या डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतकाच्या जवळ पोहचलेल्या लबूशेनला (91) बाद रवींद्र जडेजाने पहिली विकेट घेतली. त्यानंतर वेड, पॅट कमिन्स आणि नॅथन लियॉन यांना रवींद्र जडेजाने माघारी तंबूत पाठवले. या चार विकेट्स घेतल्यानंतर आता रवींद्र जडेजा अनोख्या विक्रमाजवळ पोहचला आहे. रवींद्र जडेजाने आतापर्यंत गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या एकूण 99 फलंदाजांना बाद केले आहे. त्यामुळे कांगारू संघाविरुद्ध 100 विकेट पूर्ण करण्यासाठी रवींद्र जडेजाला फक्त एक विकेट आवश्यक आहे.

रवींद्र जडेजाने अजून एक ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध शतकी बळी टिपणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी भारतीय संघाचे फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नावावर हा विक्रम आहे. अनिल कुंबळे यांनी 142 ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद केले आहे. तर त्यानंतर हरभजन सिंग दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 129 विकेट्स घेतलेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आहेत. त्यांनी गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या 124 खेळाडूंना आऊट केलेले आहे. आणि आर अश्विन चौथ्या नंबरवर आहे. त्याने 113 बळी आतापर्यंत टिपलेले आहेत. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर स्टीव्ह स्मिथच्या शतकीय व विल पुकोव्हस्की, लबूशेन यांच्या अर्धशतकीय खेळीमुळे पहिल्या डावात 338 धावा केलेल्या आहेत. तर दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने दोन गडी गमावत 96 धावा केलेल्या आहेत.      

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक बळी टिपणारे भारतीय फलंदाज - 

अनिल कुंबळे - 142 विकेट्स 

हरभजन सिंग - 129 विकेट्स 

कपिल देव - 124 विकेट्स 

आर अश्विन - 113 विकेट्स 

रवींद्र जडेजा - 99 विकेट्स 


​ ​

संबंधित बातम्या