AUSvsIND T20 : सलामीच्या टी20 सामन्यात रवींद्र जडेजा चमकला  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर आजपासून कॅनबेराच्या मनुका ओव्हल मैदानावर पहिला टी20 सामना खेळवण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर आजपासून कॅनबेराच्या मनुका ओव्हल मैदानावर पहिला टी20 सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 20 षटकांत केएल राहुलच्या अर्धशतकीय आणि जडेजाच्या वेगवान 44 धावांच्या खेळीने 161 धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावा कराव्या लागणार आहेत. 

विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम भारतीय संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर भारतीय संघाची सुरवात फारशी चांगली झाली नाही. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन हा सहा चेंडूंचा सामना केल्यानंतर मिचेल स्टार्कचा बळी ठरला. धवन केवळ एक धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांची भागीदारी होत असतानाच कोहली स्विप्सनचा शिकार झाला. कोहलीला स्विप्सनने अवघ्या नऊ धावांवर माघारी धाडले. त्यापाठोपाठ संजू सॅमसनच्या रूपात भारताची तिसरी विकेट पडली. संजू सॅमसनने 15 चेंडूत 23 धावा केल्या. त्याला हेनरिक्सने स्विप्सन करवी झेलबाद केले. 

सलामीवीर शिखर धवन, विराट कोहली आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर मनीष पांडे आणि हार्दिक पांड्या देखील आजच्या सामन्यात लवकर बाद झाले. पहिल्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याला हेनरिक्सने स्मिथ कडे झेलबाद केले. हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 16 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार खेळी करणाऱ्या रवींद्र जडेजाने आजच्या सामन्यात देखील चांगली खेळी केल्याचे पाहायला मिळाले. त्याने 23 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघ सात गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा करू शकला. 

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनला आजच्या पहिल्या टी20 सामन्यात देखील संधी देण्यात आली आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या टी नटराजन तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली होती त्याने या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तीन बाद 111 धावांवर पोहचला आहे.          


​ ​

संबंधित बातम्या