AUSvsIND : तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाने रचला इतिहास  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज कॅनबेरा येथे खेळवण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज कॅनबेरा येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीस येत दमदार खेळी केली. जडेजाने 50 चेंडूंचा सामना करत नाबाद 66 धावा केल्या. आपल्या या खेळीत रवींद्र जडेजाने 132.00 च्या स्ट्राइक रेटने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. 

पांड्याची गाडी नव्वदीतच अडकली; पहिल्या ODI शतकाची प्रतिक्षा कायम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात 302 धावा केल्या. आणि त्यामध्ये रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या दोघांनीही सहाव्या विकेटसाठी 150 धावांची नाबाद भागीदारी करत संघाची धावसंख्या 302 पर्यंत नेली. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या प्रकारात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 12 वर्षानंतर अर्धशतक ठोकले. यापूर्वी 2008 मध्ये भारतीय संघातील रॉबिन उथप्पाने अशी कामगिरी केली होती. त्याने ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात सातव्या नंबरवर खेळताना 51 धावा केल्या होत्या. 

रनमशिन विराटच्या विक्रमी खेळीनंतर विक्रमादित्य सचिन ट्रेंडिगमध्ये

याव्यतिरिक्त, रवींद्र जडेजाने धमाकेदार खेळी करताना भारतीय संघाचा माजी खेळाडू हेमांग बदानीला मागे टाकले आहे. हेमांग बदानीने 2004 मध्ये नाबाद 60 धावा केल्या होत्या. त्यामुळे रवींद्र जडेजा याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला असून, हेमांग बदानीहे तिसऱ्या नंबरवर घसरले आहेत. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियामध्ये सातव्या क्रमांकावर आलेल्या भारतासाठी सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे. 1980 मध्ये कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध 75 धावा केल्या होत्या.

सातव्या क्रमांकावर भारतासाठी सर्वात मोठे डाव खेळणारे अव्वल फलंदाज-

कपिल देव - 75 (1980)

रवींद्र जडेजा - 66* (2020)

हेमंग बदानी - 60* (2004)

रॉबिन उथप्पा - 51 (2008)


​ ​

संबंधित बातम्या