शास्त्री म्हणाले, लवकर फ्लाइट पकडा नाहीतर तुमचं काही खरं नाही

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 23 November 2020

आयपीएल सामन्यांच्या दरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. याच स्पर्धेत इशांतही जखमी झाला होता. दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून दमदार कमबॅक करण्यासाठी फिटनेसवर भर देत आहेत. बायोबबल नियमावलीनुसार, भारतातून ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांना 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत खेळायचे असेल तर लवकरात लवकर फ्लाइट पकडा, असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित आणि इशांत शर्मा यांना उद्देशून म्हटले आहे. दुखापतीमुळे सध्याच्या घडीला मायदेशात असलेले रोहित शर्मा आणि इशांत शर्मा हे दोघेही बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहेत.  

आयपीएल सामन्यांच्या दरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. याच स्पर्धेत इशांतही जखमी झाला होता. दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून दमदार कमबॅक करण्यासाठी फिटनेसवर भर देत आहेत. बायोबबल नियमावलीनुसार, भारतातून ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांना 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज

27 डिसेंबरपासून भारताच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून सराव सत्रात भाग घेण्यासाठी या दोघांना 10 पर्यंत या प्रक्रियेतून बाहेर पडावे लागेल. यासाठी रोहित आणि इशात यांना 26 नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात दाखल व्हावे लागले. 
मर्यादीत षटकातील सामन्यात रोहितचे नाव वगळ्यासंदर्भातही शास्त्रींनी भाष्य केले.

रोहित-विराट 'वाटणीवर'; कपिलपाजींचा 'कल्चर' स्ट्रोक

ते म्हणाले की, रोहितला मर्यादीत षटकातील सामन्यात खेळायचे नव्हते. अधिक काळ विश्रांतीही तुम्ही घेऊ शकत नाही. कसोटी सामन्यात खेळण्यासाठी त्यांना दोन-चार दिवसांत फ्लाइट पकडावी लागले. अन्यथा गोष्टी कठिण होतील, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही जोड कधी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

​ ​

संबंधित बातम्या