Test Best Record : अश्विन डाव्यांसमोर ठरला उजवा; मुथ्थया मुरलीधरनलाही टाकले मागे

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

अश्विनने 73 कसोटी सामन्यात आतापर्यंत 375 विकेट घेतल्या आहेत. यात 192 डावखुऱ्या फलंदाजांना त्याने तंबूत धाडले आहे.

AusvsInd Dismissing most left handers in Test cricket Record :   ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मेलबर्न कसोटी सामन्यात भारताने यजमानांना एक दिवस आणि आठ गडी राखून पराभूत केले. या विजयसाह भारतीय संघाने मालिकेत तर बरोबरी साधलीच शिवाय ऑस्ट्रेलियात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही नोंदवला. टीम इंडियाप्रमाणेच खेळाडूंच्या नावेही काही खास विक्रमाची नोंद झाली आहे. 

अश्विनने पहिल्य़ा डावातील 3 आणि दुसऱ्या डावात 2 विकेटसह सामन्यात पाच बळी मिळवले. पहिल्या डावात त्याने स्टीव्ह स्मिथला खातेही उघडू दिले नाही. मॅथ्य वेड (30), ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला त्याने अवघ्या 13 धावांवर बाद केले. दुसऱ्या डावात लाबुशेन (28) आणि हेजलवूड (10) यांची त्याने विकेट घेतली. डावखुऱ्या हेजलवूडला बोल्ड करत त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. 

अश्विनने 73 कसोटी सामन्यात आतापर्यंत 375 विकेट घेतल्या आहेत. यात 192 डावखुऱ्या फलंदाजांना त्याने तंबूत धाडले आहे. यापूर्वी सर्वाधिक डावखुऱ्यांना बाद करण्याचा विक्रम हा श्रीलंकेच्या दिग्गज फिरकीपटून मुथय्या मुरलीधरन यांच्या नावे होता. कसोटी सामन्यात सर्वाधिक (800) विकेट घेण्याचा पराक्रम करणाऱ्या मुरलीधरन यांनी 191 डावखुऱ्या फलंदाजांना माघारी धाडल्याची नोंद आहे. या यादीत जम्स अँड्रसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 600 कसोटी विकेटमधील 186 बळी हे डावखुऱ्या फलंदाजांच्या रुपात मिळवले. ग्लेन मॅग्रा  563 पैकी 172 शेन वॉर्न  708 पैकी 172 तर अनिल कुंबळे यांनी  619 पैकी 167 डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या