AUSvsIND: तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीची ठिकाणं बदलण्याची शक्यता; वाचा काय आहे कारण?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 23 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळवण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळवण्यात येत आहे. व या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकलेला आहे. तर दुसरा कसोटी सामना येत्या शनिवार पासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. आणि तिसरा सामना सिडनी येथे व चौथा  सामना ब्रिस्बेन येथे खेळवला जाईल. मात्र दोन्ही देशांतील चौथ्या सामन्याचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर क्वीन्सलँड प्रशासन सर्व खेळाडूंना सिडनीतच रोखण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन ऐवजी सिडनीतच खेळवला जाऊ शकतो. 

ICC T20 Ranking: विराटची प्रगती; तर न्यूझीलंडचे सेफर्ट व साउदी यांची गरुड झेप

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान सिडनीत खेळवण्यात येणार आहे. तर ऑस्ट्रेलियात काही भागांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकारणांमुळे स्थानिक प्रशासनाने हाय अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडनीच्या उत्तर भागात कोरोनाचा प्रभाव वाढू लागलेला आहे. अशातच तिसऱ्या सामन्यानंतर न्यू साऊथ वेल्स प्रशासनाने खेळाडूंना ब्रिस्बेन मध्ये येण्यास परवानगी नाकारली तर चौथ्या कसोटी सामन्यावर काळे ढग दाटण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळवण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंड ट्रस्टचे चेअरमन टोनी शेफर्ड यांनी नुकतेच एका मुलाखतीत, वेळ पडल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि चौथा कसोटी सामना सिडनीत खेळवण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवण्यात येणाऱ्या मेलबर्न येथे देखील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही संघांना सिडनीला न जाता शेवटच्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला जाता येईल.    

''विराटच्या अनुपस्थितही भारतीय फलंदाजांना रोखणं हे मोठे आव्हान... 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना सिडनीत 7 जानेवारीला आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला ब्रिस्बेन मध्ये खेळवला जाईल.


​ ​

संबंधित बातम्या